सोलापूर शहर युवक काँग्रेस आयोजित ५१ जणांचे रक्तदान
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.२१
खा.प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त व पहलगाम हल्यातील शाहिदांच्या सन्मानार्थ सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरच्या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी आयोजक गणेश डोंगरे म्हणाले स्व. राजीव गांधी व पहलगाम हल्ल्यातील शहीदांच्या स्मरणार्थ या रक्तदान आयोजन केले होते. राजीवजी गांधी यांनी या देशासाठी बलिदान दिले होते. रक्तदानमुळे सुद्धा संकटात असलेल्या रुग्णाचे जीव वाचणार आहे. यामुळे रक्तदान शिबीर आयोजन केले आहे.

माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेवक विनोद भोसले, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनिल रसाळे, माजी नगरसेविका फिरदौस पटेल, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, प्रा. नरसिंह आसादे, शकील मौलवी, भीमाशंकर टेकाळे, बाबुराव म्हेत्रे, नागनाथ कदम, सिद्धाराम चाकोते,अक्षय दिल्लीवले, ज्योतीराम पाटील, अजित सिरसट आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते व उपस्थित होते.