:- जुन्या एम्प्लॉयमेंट चौकात बेशिस्त वाहतुकीला आली उभारी
:- वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम बसवले धाब्यावर ;
:- अपघाताला मिळते खुले आमंत्रण वाहतूक शाखेने लक्ष देण्याची गरज
कार चालकांचा रस्त्याच्या बाजूला ठिय्या
रस्त्याच्या मधोमध थांबलेली रिक्षा
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि २७ जून – सोलापूर शहरातील स्मार्ट वाहनधारकांची बेशिस्त वाहतूक चव्हाट्यावर येत आहे. शहराच्या मध्यवर्ती व्ही.आय.पी रोडवर नेहमी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे वाहनधारकांची कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच गुरुवारी सकाळी रस्त्याच्या बाजूला कारसह रिक्षा उभी केल्याने वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
दरम्यान व्हीं.आय.पी रोडवर सर्रासपणे अशाप्रकारे वाहने बिनधास्तपणे उभी केली जात असल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. यापूर्वी याठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिसांची सातत्याने कारवाई होत असे त्यामुळं वाहनधारक येथे आपली वाहने उभी करत नव्हते, मात्र आता कारवाई थांबल्याने बेशिस्त वाहतूकीला आणि पार्किंग उभारी आली आहे. रस्त्याच्या बाजूला हॉटेल्स आणि विविध प्रकारचे दुकाने आहेत त्यामुळे वाहनधारक रस्त्यावरच आपले वाहन उभे करून खरेदीला वेगवेगळ्या दुकानात आणि हॉटेलमध्ये जात आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहतूकीला आणि वाहतूक कोंडीला चालना मिळत आहे. वारंवार वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासला जात आहे. मात्र या वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जात नाही.
सोलापूर शहरातील प्रमुख व्ही.आय.पी रोडवरील सुरळीत वाहतूकीला सदरची बेशिस्त वाहतूक अडथळा ठरत आहे. रस्त्याच्या बाजूला वाहनांच्या लागलेल्या पार्किंगच्या रांगामुळे ईतर वाहनधारकांना वाहन चालवणे जिकरीचे आणि कठीण होऊन बसले आहे. अशातच रिक्षाचालक देखील प्रवासी दिसताक्षणी रस्त्याच्या मधोमध ब्रेक लावून रिक्षा थांबवत आहेत. त्यात वाहनाचा अपघात होण्याचा धोका निर्माण होत आहे. सदरच्या या बेशिस्त वाहतूकीमुळे अपघाताला कारणीभूत ठरत आहे.
वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई करण्याची गरज
शहरातील वाढत चाललेल्या बेशिस्त वाहतूकीवर आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाइमध्ये सातत्य कायम ठेवले पाहिजे. जेणे करून बेशिस्त वाहतूकीला पायबंद घालता येईल.
जेष्ठ नागरिक,