दक्षिणेत घडतेय नाराजी नाट्य ; पदाधिकारी आणि नागरिकांनंतर आता कार्यकर्ते आमदार सुभाष देशमुखांच्या कार्यपद्धतीवर नाराज ? चर्चेला आले उधाण 

दक्षिणेत घडतेय नाराजी नाट्य ;भाजप पदाधिकारी आणि नागरिकांनंतर आता कार्यकर्ते आमदार सुभाष देशमुखांवर नाराज ?चर्चेला आले उधाण…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१८ नोव्हेंबर –

सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सुर ऐकण्यास मिळत आहे. ऐन निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याने बापूंना विधानसभा निवडणूक जड जाते की काय? अशा चर्चांना आता चेव फुटला आहे.

   दरम्यान यापूर्वीच निष्क्रिय आमदार म्हणून विरोधकांनी सूर आवळला आहे. आता नागरिकांच्या घराघरात देखील ही चर्चा ऐकण्यास मिळत आहे. अशातच पुन्हा दक्षिण मध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याने, सुभाष देशमुख आपल्या कार्यकर्त्यांवर आणि समर्थकांवर विश्वास ठेवतात की नाही? अशी कुजबुज राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळत आहे. अनेक वर्षांपासून निष्ठावंत म्हणून कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तोंडावर बापूंच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

     हद्दवाढ विभागात भाजपची पहिली शाखा सुरू केली. महापालिकेतील विरोधी पक्ष नेतेपद भूषविले. तीस वर्षापासून कार्यरत असलेल्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजपात स्थान नाही. पक्षात नेत्यांची गटबाजी वाढली. पक्षापेक्षा स्वतःला मोठे असल्याचे नेत्यांना वाटणे हे चुकीचे आहे. अशा परिस्थितीत पक्षात काम करणे अवघड आहे. त्यामुळे आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून आपण भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते आप्पासाहेब चौगुले यांनी यापूर्वीच जाहीर केले होते.

   दरम्यान दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आमदार सुभाष देशमुख यांना भाजपने उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजपच्याचा माजी नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर भाजपचे माजी विरोधी पक्ष नेते आप्पासाहेब चौगुले यांनी भाजपमध्ये जुन्या निष्ठावंत अभ्यासू कार्यकर्त्यांची कदर नाही. त्यांना स्थान नाही. विचारात घेतले जात नाही आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून अखेर भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे  जाहीर केले. यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. राजीनाम्याची प्रत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेही मेल द्वारे  पाठविली असल्याचे चौगुले यांनी स्पष्ट केले.गेल्या दहा वर्षापासून भाजपामध्ये गटबाजी वाढली आहे. शिस्त राहिली नाही. संघटना विस्कळीत झाली आहे. असे आरोप त्यांनी केले होते.

दरम्यान पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका केल्याने जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रमावस्था चे वातावरण पसरले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांची ही अवस्था असेल तर आपली काय गत होईल ?  या विचाराने कार्यकर्ते आणि नागरिक त्रस्त झालेले आहेत. गत दोन टर्ममध्ये कोणती विकासाची ठोस कामे झाली आहेत असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *