होम टू होम प्रचारात बाबा मिस्त्रींचे जल्लोषात स्वागत….
दक्षिण विधानसभा मतदारसंघ काढला चाळून !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.११ नोव्हेंबर – दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार मौलाली सय्यद (बाबा मिस्त्री) यांनी मतदारसंघातील नई जिंदगी परिसरात होम टू होम प्रचार केला. प्रत्येक ठिकाणी नागरिकांकडून – बाबा मिस्त्री यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. होम टू होम, कॉर्नर बैठक, गावभेटसह रविवारी नई जिंदगीमध्ये होम टू होम प्रचार करण्यात आला.
दरम्यान सोरेगाव, नंदूर, औज, वांगी, माळकवठे या गावांत दिवसभर गावकऱ्यांसोबत बैठका झाल्या. रविवारी नई जिंदगी परिसरात होम टू होम प्रचार करण्यात आला. यावेळी बाबा मिस्त्री यांचा हा प्रभाग असल्यामुळे प्रत्येक नागरिकाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शंकर जाधव, रवी हुमणे, अमोल बिजापुरे, अनिस सय्यद, मुर्तुज शेख, अख्तर शेख, खलील हिरोली, आसिफ शेख, याकूब शेख आदी उपस्थित होते.