होटगी रोड परिसर व हत्तुरे वस्ती येथे धर्मराज काडादी यांच्या पदयात्रेस प्रतिसाद …
मतदारांनी पुष्पवृष्टी करून केले स्वागत

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ नोव्हेंबर –
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांना निवडून देण्याचा संकल्प होटगी रोड आणि परिसरातील मतदारांनी व्यक्त केला. गुरूवारी, सकाळी काडादी यांच्या प्रचारासाठी निघालेल्या पदयात्रेत सर्व पक्षीय मतदारांचा मोठा सहभाग होता. मतदारांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टीकरून काडादी यांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी आकर्षक रांगोळीव्दारेही विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. नागरिकांनी पुष्पहार घालून तर अंतःकरणपूर्वक स्वागत केले तर सुवासिनींनी औक्षण करुन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या दहा वर्षापासून सत्तेवर असलेल्या उमेदवाराकडून सातत्याने होणार्या अन्यायातून सुटका होण्यासाठी काडादी यांचा विजय आवश्यक असल्याचे प्रतिपादन नागरीकांनी केले. सोलापूरच्या हद्दवाढ भागातच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असलेले धर्मराज काडादी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प मतदारांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळी नऊ वाजता होटगी रोडवरील बसवेश्वर नगर येथून पदयात्रेचा शुभारंभ झाला. फटाक्यांच्या आतषबाजीसह ढोल-ताशांच्या निनादात ही भव्य-दिव्य पदयात्रा निघाली. श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महाराज की जय, श्री सिध्देश्वर परिवाराचा विजय असो, निवडून निवडून येणार कोण, काडादी साहेबांशिवाय येणार कोण, हवा कुणाची काडादी साहेबांची, काडादी साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, काडादी साहेबांचा विजय असो अशा घोषणा या पदयात्रेत सहभागी नागरिकांनी दिल्या. धर्मराज काडादी यांचे छायाचित्र व ङ्गकॉम्प्युटरफ हे त्यांचे निवडणूक चिन्ह असलेले टी-शर्ट घातलेले, टोपी, उपरणे परिधान केलेले कार्यकर्ते पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांच्या हातात धर्मराज काडादी यांचे छायाचित्र व ङ्गकॉम्प्युटरफ हे निवडणूक चिन्ह असलेले लक्षवेधी फलकदेखील होते. कार्यकर्त्यांनी विमानतळ परिसरातील मतदारांच्या घरी जाऊन त्यांना काडादी यांचे माहितीपत्रक देऊन ङ्गकॉम्प्युटरफ या निवडणूक चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
बसवेश्वर नगर येथून सुरू झालेली पदयात्रा महाळींगराया नगर, रेवणसिध्देश्वर नगर, शंकर नगर, कुमठा रोड, टिकेकर वाडी, हरळय्या नगर, राहुल वस्ती, कामरान चौक, हत्तुरे वस्तीतील ओम नम शिवाय नगर, स्वामी विवेकानंद नगर,हत्तुरे नगर, मल्लिकार्जुन नगर या भागात झाली. या मार्गावर सोलापूर दक्षिणच्या सर्वंकष विकासाची आस असलेल्या अनेक परिवारांनी काडादी यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. अण्णा गणपती मंडळातर्फे पुष्पवृष्टी करून काडादी यांचे स्वागत करण्यात आले. रेवणसिध्देश्वर नगर येथील जगदंबा भवानी मातेचे काडादी यांनी दर्शन घेतले. शिवगौरी माता आणि महादेव मंदिरातही काडादी यांनी श्रींचे दर्शन घेतले.