मी आश्वासन देत नाही प्रत्यक्षात कृती करतो :- आमदार सुभाष देशमुख 

मी आश्वासन देत नाही प्रत्यक्षात कृती करतो आमदार सुभाष देशमुख 

हत्तुर येथे आयोजित सभेला प्रचंड गर्दी..

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१४ नोव्हेंबर –

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्राचार जोमात सुरू असून, सत्ताधारी भाजप पक्षाचे सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचा अधिकृत उमेदवार सुभाष देशमुख यांनी ग्रामीण भागात प्रचार, सभा, रॅली काढून भाग पिंजून काढला आहे. हत्तुर येथे आमदार सुभाष देशमुख यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, आम्ही विरोधी पक्षांसारखे आश्वासन देत नाही तर प्रत्यक्षात कृती करतो असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले. गुरुवारी आमदार सुभाष देशमुख यांनी मनगोळी, अकोले मंद्रूप, गुंजेगाव, कंदलगाव, वडापूर कुसुर तेलगाव, विंचूर, निम्बर्गी आदी भागात दौरा केला.

दक्षिण तालुक्याचा दहा वर्षात चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. येथील सोमेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आहे आम्ही जे बोलतो तेच करतो. न होणारे न पूर्ण होणारे आश्वासन कधीच देत नाही. विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता, जातीपातीचे राजकारण न करता जनतेने पुन्हा एकदा महायुतीला साथ द्यावी. मला तिसऱ्यांदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी. निश्चितच दहा वर्षात जेवढा विकास झाला तेवढा विकास येत्या पाच वर्षात करण्याची ताकद मला पुन्हा द्यावी असेही आमदार देशमुख म्हणाले.

प्रारंभी हातुर गावात आमदार सुभाष देशमुख यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आमदार सुभाष देशमुख यांच्यामुळेच दक्षिण तालुक्याचा विकास झाल्याचे सांगत त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे अभिवचन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, हणमंत कुलकर्णी, चनगोंडा हाविनाळे,नामदेव पवार,अंबिका पाटील,अप्पासाहेब मोटे,यतीन शहा राजेंद्र कुलकर्णी, धर्मराज राठोड, गुरुप्पा कुलकर्णी, बनसिद्ध भरले, राजशेखर सलगरे, अशोक कनपवाडीयार, बनसिध्द अमोगी, पटेवाडीयार, सोमनाथ ढगे, स्वप्नील पाटील, राजशेखर पाटील, कांतप्पा पावटे, महादेव कुलकर्णी, प्रकाश भरले, शिवानंद पाटील, सिद्धाराम भिंगे, सोमनिंग व्हनमाने, महेश कनपवाडीयार, राम पुजारी, प्राजक्ता निंबर्गी, श्रीशैल हिरेमठ, मारुती कुंभार, कांचन कुंभार, सिद्धाराम कानडे, अमोगी गुंडगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *