विकासकामांच्या जोरावर विजयाची हॅट्रिक करणार
आमदार सुभाष देशमुख यांचा विश्वास
शहर सह ग्रामीण भागात विविध ठिकाणी कॉर्नर बैठका…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१३ नोव्हेंबर –
केंद्र व राज्यसरकारच्या माध्यमातून मागील १० वर्षात केलेल्या विकासकामाच्या माध्यमातून दक्षिण सोलापूरचा झालेल्या विकासाच्या जोरावर आपण या विधानसभा निवडणुकीत नक्कीच हॅट्रिक करू, असा विश्वास आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी सोमवारी संध्याकाळी आणि मंगळवारी सकाळच्या सुमारास शहर आणि आणि ग्रामीण भागातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. यामध्ये अमृत नगर, गंगाधर नगर, ग्रामीण भागातील वांगी, वडकबाळ सह अनेक ठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची ही संवाद साधला. कार्यकर्त्यांनी मला केवळ आता आठ दिवस द्यावे त्यानंतर मी कार्यकर्त्यांसाठी पूर्ण पाच वर्ष सेवा करणार आहे असे सांगत आमदार देशमुख यांनी कार्यकर्त्यांना प्रचार यंत्रणा कशी राबवावी, त्याche नियोजन कसे करावे आणि प्रत्येक बुथवर जास्तीत जास्त मतदान कसे करून घ्यावे याबद्दल मार्गदर्शन केले.
अमृत नगर येथे नंदू पाटील, किशोर पवार, नरसिंह गुमटे, रवी सरमाळकर, शांताबाई शिंदे,प्रणव कुलकर्णी, उज्वला पाटील,छाया जाधव आदी उपस्थित होते. गंगाधर नगर येथे याप्रसंगी ऍड हेमंत माळी, ऍड मचाले, ऍड कोणापुरे,ऍड लोंढे,ऍड मंजुनाथ कक्कलमेळी,ऍड टाकळीकर, ऍड स्नेहा सरभी,तसेच सोसायटीचे सर्व सभासद,महिला, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
शिवयोगी नगर सोसायटी येथील सोसायटीतून मोठ्या मताधिक्याने सुभाष देशमुख यांना निवडून आणण्याचा निर्धार केला . याप्रसंगी देवानंद चिलवंत, विशाल गायकवाड, संगीता जाधव, सोसायटीचे अध्यक्ष पाटील ताई, डॉ. सोळसे, हचडे सर, श्री. वळसंग सर तसेच सोसायटीचे सर्व सभासद,महिला, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. वांगी येथील कॉर्नर बैठकीप्रसंगी आनंद तालुकाध्यक्ष संगप्पा केरके,शामराव हांडे,राहुल पुजारी, सुनील व्हनमाणे व ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी आमदार सुभाष देशमुख यांनी वडकबाळ या गावी भेट देऊन नागरिकांना विकासासाठी महायुतीला साथ देण्याचे आवाहन केले. यावेळी होगेप्पा पुजारी, सिद्धप्पा बिराजदार,परसप्पा गडदे,सुनील व्हनमाने, विलास राठोड व ग्रामस्थ उपस्थित होते.