शेतकर्यांच्या कल्याणासाठी महायुतीला विजयी करा – सुभाष देशमुख
दक्षिण तालुक्याचा अधिकचा विकास होण्यासाठी भाजपला साथ देण्याचे केले आवाहन….
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.११ नोव्हेंबर –
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असे चित्र दिसत आहे. राज्यात तसेच सोलापूर शहर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेले आघाडी व युतीचे उमेदवारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू केले आहेत. महायुती सरकारवर विरोधी पक्षाने संधान साधल्यानंतर आता महायुती सरकारच्या उमेदवारांनी आघाडीवर निशाणा साधला आहे.
सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ.सुभाष देशमुख यांनी आघाडीचा समाचार घेताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात विकासाच्या अनेक योजना बंद केल्या होत्या. महायुती सरकारने त्या पुन्हा सुरू केल्या शिवाय आणखी कल्याणकारी योजनाही जाहीर केल्या. यात शेतकर्यांच्या हिताच्या अनेक योजना आहेत. शेतकरी सन्मान योजनेमुळे अनेकांना फायदा झाला आहे. शेतकर्यांच्या कल्याणासाठी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणा असे आवाहन दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आ. सुभाष देशमुख यांनी केले.
आ. देशमुख यांनी डोणगाव तांडा, डोनगाव, नंदुर, तेलगाव, पाथरी, नांदणी, टाकळी, बरूर, सांजवाड बोळकवठे, राजूर होनमुर्गी भागात प्रचार करत मतदारांशी थेट संपर्क साधला. आ. देशमुख म्हणाले की, दक्षिण तालुक्याचा विकास व्हावा यासाठी आपण, शेती, पर्यटन, रस्ते विकास यांना चालना दिली. प्रत्येक गावाला निधी देत अंतर्गत कॉंक्रीट रस्ते, पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटारी केल्या. अगदी छोटी गावे, वाडी वस्ती यांना जोडणारे रस्ते निर्माण केल्यामुळे या भागात कृषिपूरक व्यवसाय वाढला आहे. या भागातील शेतकर्यांची विजेची समस्या मिटावी यासाठी ८ नवीन विद्युत उपकेंद्रे उभारली, हत्तरसंग वीज उपकेंद्रामुळे नदीकाठच्या शेतकर्यांची मोठी सोय झाली असून पुरेशा दाबाने वीज पुरवठा आता होत आहे.
भीमा सीना नदीजोड प्रकल्पामुळे नदीकाठच्या ५८ किलोमीटर परिसरात शेतकर्यांना सिंचनासाठी बारमाही पाण्याचा साठा उपलब्ध होणार आहे. राजूर येथे नदीवर ९ कोटी रुपयांचा पूल बांधून ऊस बागायत शेतकर्यांच्या वाहतुकीची सोय केली. स्व. आनंदराव देवकते यांच्या इतकेच प्रेम मला राजूरच्या मतदारांनी दिल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी संपूर्ण दौर्यात तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, हणमंत कुलकर्णी, डॉ चनगोंडा हाविनाळे, संदीप टेळे, अप्पासाहेब मोटे, यतीन शहा, अंबिका पाटील, दिपाली व्हनमाने, सुजित चौगुले, गंगाधर इटकर, रवी नंदराळे, सतीश कोळी, गुरू बिराजदार, संगमेश्वर बिराजदार, महानतेश बिराजदार, सुरेश बगले, दिपाली व्हनमाने, अमित मूलवाड, सिद्धराम घोडके, रवी बिराजदार, शिवानंद बंडे, शिवानंद डोमनाळे, मल्लिकार्जुन सुरवसे, सचिन बंडे, बनसिध्द वडरे, प्रकाश पुजारी, महादेव पुजारी आदींसह महायुतीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.