दक्षिण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपला साथ द्या- आ.सुभाष देशमुख यांचे आवाहन !
सोलापूर दक्षिण तालुक्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी बैठकांचे सत्र सुरू….
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.११ नोव्हेंबर – महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी शेतकरी वीज बिल माफ, लाडकी बहीण योजनेचा दक्षिण तालुका मतदारसंघातील हजारो लोकांना फायदा झाला आहे. महायुती सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. त्यामुळे महायुतीला मतदान करूनद दक्षिण तालुक्यासह महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला साथ द्यावी, असे आवाहन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
निवडणुकीच्या प्रचारार्थ आ. देशमुख यांनी रविवारी टाकळी, बरूर, बोळकवठे, संजवाड, होनमुर्गी आदी गावांना भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी आ. देशमुख यांचे स्वागत केले. महिलांना लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे आम्हाला उद्योग, व्यवसायाला हातभार लागत असल्याचे सांगितले. यावेळी आ. देशमुख म्हणाले की, मागिल वर्षांत जेवढा विकास झाला नाही, तेवढा विकास या १० वर्षाच्या कार्यकाळात झाला आहे.
होटगी पर्यटन केंद्रासाठी ५ कोटींचा निधी, होटगी आश्रमशाळा आणि वसती गृह बांधण्यासाठी ३२ कोटी, हत्तरसंग कुडल देवस्थानसाठी १३ कोटी, नांदणी वन व उद्योग केंद्रासाठी ३ कोटी, हिरज रेशीम बाजारपेठेसाठी साडेसात कोटी, वडापूर बॅरेजसाठी ६७ कोटी निधी मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण तालुक्याला भरभरून निधी दिला आहे. आगामी काळातही यापेक्षा जास्त निधी तालुक्यात आणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा महायुतीने साथ द्यावी.
यावेळी तालुकाध्यक्ष संगप्पा केरके,हणमंत कुलकर्णी, संदीप टेळे, अप्पासाहेब मोटे, अंबिका पाटील, सतीश कोळी, गुरू बिराजदार, संगमेश्वर बिराजदार, महानतेश बिराजदार, सुरेश बगले, दिपाली व्हनमाणे,अमित मूलवाड, सिद्धराम घोडके,रवी बिराजदार, डॉ चनगोंडा हाविनाळे, संदीप टेळे, अप्पासाहेब मोटे, यतीन शहा,अंबिका पाटील,दिपाली व्हनमाने, सुजित चौगुले,गंगाधर इटकर, रवी नंदराळ, दिपाली व्हनमाने, बनसिध्द वडरे, माजी सोसायटी चेअरमन प्रकाश पुजारी, महादेव पुजारी, सरपंच शिवपुत्र तांडूरे, यलगोंडा बिराजदार, मसण्णा गायकवाड, गोविंद पाटील, पद्मयोगी वडरे, भीमाशंकर पुजारी, सुधाकर पुजारी तसेच गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.