होम टू होम होतीय एकच चर्चा जनता घेणार अपमानास्पद वागणूकीचा बदला ; दक्षिणमध्ये घडणार परिवर्तन….. अपमानाचा बाण नागरिकांना लागला वर्मी
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१८ नोव्हेंबर –
सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन दिवसांपासून वारे उलटे वाहत आहे. सत्ताधारी आमदारांना विरोधकांनी तसेच जनतेने घरी पाठवण्याचे निर्धार केल्याचे सांगितले जात आहे. सध्या जुळे सोलापुरात होम टू होम मेसेज फिरत आहेत. होम टू होम चर्चा केली जात आहे. दरम्यान ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. यामुळे सत्ताधारी आमदारांना ही निवडणूक जड जाते की काय ? अशी अवस्था आणि परिस्थिती निर्माण झाली आहे.

होम टू होम होतीय एकच चर्चा !
– जुळे सोलापुरातील नागरिकांनो जागे व्हा हीच ती वेळ आपल्याला अपमानास्पद वागणूक दिल्याची, गणेशभक्तांना, देवी भक्तांना, भीक कशाला मागता असे बोलून अपमानास्पद वागणूक दिलेली आपण विसरणार आहात का..?
– जुळे सोलापुरातील असे अनेक नगरे आहेत तेथे जणू काही आपण खेडेगावात आहोत की काय असा भास होतो, कोणतीही सुविधा नाही हे विसरणार का?
– विद्यमान आमदारांकडे सोई सुविधा बाबत निवेदन देण्यासाठी गेले असता त्यांना खोचकबोलणे, तुम्ही आम्हाला मतदान केले नाही, तुम्ही आम्हाला मतदान नाही केले तर काहीच फरक पडत नाही, अशी हीण वागणूक दिलेली आपण विसरणार आहात का..?
– शासनाकडून आलेला निधी मधून निकृष्ट कामे करून शासनाचा पैसा जनतेच्या डोळ्यादेखत लुटत आहेत हे आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत तरीपण आपण गप बसणार आहात का..?
– निष्क्रिय आमदारांना आपण घरी बसवण्याची हीच ती वेळ आहे नाहीतर पश्चाताप होईल. वेळीच जागे व्हा ?
– विशेष करून केंद्रातील पक्ष नेतृत्व व महाराष्ट्रातील पक्षाकडून प्रचारासाठी आलेल्या निधीचा स्वमंगल करत स्वतःचा फायदा करून घेत आहे. का?
– जुळे सोलापूरातील व हद्दवाढ भागातील सुजाण नागरिकांनी व्यक्त केल्या व्यथा….

दरम्यान होम टू होम होत असलेल्या या चर्चावरून सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघात यंदा परिवर्तन घडेल का? असे तर्कवितर्क लढवले जात आहेत.