चेतन नरोटे यांना निवडून आणण्याचा निर्धार  ;

चेतन नरोटे यांना निवडून आणण्याचा निर्धार 

रामवाडी प्रभाग क्रमांक २२ येथे हजारोंच्या उपस्थितीत झाला मेळावा…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१६ नोव्हेंबर – 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीचे शहर मध्य चे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांना निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. त्याच अनुषंगाने खा.प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक २२ येथे रामवाडी भागात शहर मध्य विधानसभा महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेमध्ये हजारोंच्या संख्येने मतदारांनी निवडून आणण्याचा निर्धार केला.

    खा. प्रणिती शिंदे आपल्या मनोगतात म्हणाले मी गेली १५ वर्ष या भागाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य मला तुमच्यामुळे मिळाले.खासदार निवडणूकीत शहर मध्य मधून प्रभाग क्रमांक २२ मधून सर्वाधिक मताधिक्य मिळाले. अशाच पध्दतीने काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले उमेदवार चेतनभाऊ नरोटे यांना जास्तीतजास्त मतांनी निवडून दया.महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात महालक्ष्मी योजनेतून महिलांना महिन्याला ३००० रूपये व महिलांना मोफत बसप्रवास,बेरोजगार युवकांना भत्ता ४००० रुपये,नागरिकांना २५ लाखांचा आरोग्य विमा,शेतकऱ्यांना ३ लाख पर्यंतची कर्जमाफी,जातीय जनगणना करून ५०% आरक्षण मर्यादा हटवणार.अशा पाच गॅरंटी आम्ही देणार आहोत असे म्हणाले.

      यावेळी व्यासपीठावर माजी महापौर संजय हेमगड्डी, नगरसेवक विनोद भोसले,मदन गायकवाड,महिला काँग्रेस अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे,कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार,डि ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष देवा गायकवाड,युवा नेते अनिल जाधव,तिरुपती परकीपंडला,मागासवर्गीय काँग्रेस सेल अध्यक्ष मयूर खरात,सौ.राजनंदा गणेश डोंगरे व इतर मान्यवरांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली.तत्पूर्वी या सभेचे स्वागत प्रास्ताविक आयोजक युवक कॉंग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी तर आभार प्रदर्शन युवा नेते विक्रम गायकवाड यांनी केले. या सभेचे आयोजक सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे,युवा नेते विक्रम गायकवाड, चंद्रकांत नाईक,सचिन गायकवाड, दाऊद नदाफ,दिनेश डोंगरे,दत्ता हरभरे,रितेश जाधव,युवराज जाधव,गोपाल शिंगे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *