शहरी हद्दवाढ भागात ७०० कोटींची विकासकामे केलीः आ. देशमुख
जुळे सोलापूरसह विविध भागात बैठकाचे सत्र सुरू….!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.९ नोव्हेंबर – आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात शहरी हद्दवाढ भागात सर्व प्रकारच्या नागरीसुविधा निर्माण करत सुनियोजित विकास केला. 125 कोटीच्या निधीमधून अंतर्गत डांबरी व कॉंक्रीटचे रस्ते बनवले. अमृत योजनेंतर्गत 165 कोटी रुपयाच्या निधीतून भूमिगत गटारे बनवली. सुवर्ण जयंती नगरोथान अंतर्गत 429 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळावली, आसरा ते जुळे सोलापूरला जोडणार्या रेल्वे पुल विस्तारासाठी 28.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. अशाप्रकारे 700 कोटींपेक्षा जास्त विकासकामांना मंजुरी मिळवली आहे. यातील काही कामे पुढील काळात पूर्ण होतील.
गेल्या दहा वर्षात मी जनतेचा सेवक म्हणून केले आहे आणि यापुढेही करणार आहे, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. देशमुख यांनी शहर भागातील जुळे सोलापूर, डीसीसी बँक कॉलनी, देगाव परिसरातील नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नागरिकांनी आ. देशमुख यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले.
आ. देशमुख पुढे म्हणाले की, हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी 12.50 कोटी रुपयांची कामे करण्यात केली आहेत. महायुती शासनाने, मुलींना उच्च शिक्षण मोफत केले, विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय केली. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामार्फत एक लाखाहून अधिक नवउद्योजकांना अर्थसहाय्य केले. शेतकर्यांना वीज बिल माफ केले आहे. पुढील पाच वर्षे मोफत पुरवठा केला जाणार आहे. आगामी काळात 25 हजार युवतींची पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.2019 मध्ये जनतेने युतीला कौल दिला होता. पण वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी जनतेचा घात केला. अडीच वर्षांमध्ये फक्त त्यांनी लोक कल्याणाच्या अनेक योजना रद्द केल्या, याचा फटका आपल्या मतदार संघालाही बसला आहे. कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशातील महिला सक्षमीकरणाच्या योजना कॉंग्रेस सरकारने बंद केल्या. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना रद्द व्हावी यासाठी त्यांनी कोर्टात धावही घेतली आहे. याउलट राज्यात पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजनेत वाढ करण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे.त्यामुळे सोलापूर शहराच्या प्रगतीसाठी कमळाच्या चिन्हा समोरील बटन दाबून मला पुन्हा एकदा संधी द्यावी.
यावेळी भाजपा सरचिटणीस विशाल गायकवाड, आनंद बिराजदार, महेश देवकर,अमोल गायकवाड, शिलरत्न गायकवाड, डॉ. शिवराज सरतापे, हेमंत पिंगळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.