ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात श्रावणाची लगबग..मुस्लिम कारागीर अर्पण करतात सिध्देश्वर महाराजांच्या चरणी सेवा…

पवित्र श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर फुलांची सजावट करण्यात मुस्लिम कारागीर व्यस्त…

मुस्लिम कारागीर फुले ओवण्यत व्यस्त
सिद्धेश्वर महाराजांचे नयनरम्य मंदिर

गेल्या दोन पिढ्यांपासून मुस्लिम कारागीर अर्पण करतात सिध्देश्वर महाराजांच्या चरणी सेवा…

सोलापूर दि ३ ऑगस्ट – पवित्र श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत श्रीशिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या शिवयोग समाधीस मेघडंबरीच्या सजावटीसाठी मंदिरात शेवंती, झेंडू , अष्टर, अशी विविध फुले दाखल झाले असून मुस्लिम कारागीर फुले ओवण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.

        हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. श्रावण महिन्यात ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी असते. असंख्य भाविक भक्तांनी मंदिर परिसर फुलून जाते. याच पार्श्वभूमीवर श्रीसिध्देश्वर महाराजांच्या मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात कारागीर व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. श्रीसिध्देश्वर महाराजांच्या शिवयोग समाधीवर वेगवेगळ्या प्रतिकृती उभारण्यात येऊन त्यावर फुले सजवली जातात. यंदाच्या वर्षी ओम , स्वतिक आणि शिखरावरील महादेव अशी सजावट आणि मेघडंबरीच्या करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे वेगवेगळ्या प्रकारचे तेराशे किलो फुले यांचा समावेश करण्यात येत आहे.

           दरम्यान सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील श्रावण महिन्यात ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात आणि मंदिर परिसरात श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने विविध तयारी सुरू आहे. शिवयोग समाधीस्थळ करण्यात आले आहे, धार्मिक विधी संपन्न करण्यासाठी समाधीच्या चारही बाजूला स्पीकर लावण्यात आले आहेत, तुटलेल्या फरश्या काढून नवीन फरशी लावण्यात येत आहेत.

श्रींच्या गर्भ गाभाऱ्यात देखील विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमासाठी प्रासादिक साहित्य आणि वस्तूंचे तयारी पूर्ण केली आहे. तसेच मंदिर परिसरात कायमचे स्टॉल्स उभारण्यात येत आहेत. फाउंडेशनचे कामपूर्ण झाल्यांनतर त्यावर लोखंडी खांब लावून कायमचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. त्या लोखंडी स्टॉल्सना आता रंग लावण्यात येत आहे. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते त्याच अनुषंगाने मंदिरात दर्शनरांगा तयार करण्यात आलेल्या आहेत. स्त्री पुरुष असे दोन रांगा तयार करण्यात आल्याचे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले.

गेल्या दोन पिढ्यांपासून मुस्लिम कारागीर अर्पण करतात सिध्देश्वर महाराजांच्या चरणी सेवा…

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. समाधीस आकर्षक फुलांची सजावट करण्यासाठी मुस्लिम कारागीर बांधव रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. यामध्ये जाकीर चौधरी, शकूर कल्याणी , शकील शेख , जाफर कल्याणी , बुजरूक गुंजेगाव यांसह अनेक कारागीर विविध फुलांपासून आकर्षक सजावट करण्यासाठी तयारीत व्यस्त आहेत.

मेघडंबरीच्या कामातून एक वेगळा प्रकारचा आनंद आणि ऊर्जा मिळते….

झाकीर चौधरी

आमची दुसरी पिढी ही सिद्धेश्वर महाराजांच्या सेवेत कार्यरत आहे. यापूर्वी माझे वडील त्यानंतर काका आता आम्ही आणि आमची मुले म्हणजे येणारे पुढची पिढी ही देखील या कामात व्यस्त आहेत. श्रावणातील प्रत्येक सोमवारी फुलांची सजावट करण्यासाठी आम्ही पूर्वतयारी करतो. कोणत्या डिझाईनमध्ये सजावट करायची आहे. त्याचे नियोजन करून तशी फुले आणि फोम इतर साहित्य मागवली जातात. त्यानंतर दोन ते तीन दिवस अगोदर पासून याचे कामकाज केले जाते. रविवारी रात्री उशिरा मेघडंबरी पवित्र समाधीवर स्थापित केली जाते. या कामातून एक वेगळा आनंद आणि ऊर्जा मिळते. 

जाकीर चौधरी , फुल कारागीर.

आमच्यासह मुस्लिम समाज बांधव देखील खांद्याला खांदा लावून सेवा अर्पण करतात…..

मंजुनाथ

श्रावण महिन्यातील सजावटीसाठी सोलापूरसह कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यातून विविध प्रकारची सजावटीची फुले मागवली जातात. यासाठी सुमारे बाराशे किलो फुले मागवून त्याची डिझायनुसार सजावट केली जाते. मार्केट यार्डमधील दुकानाच्या माध्यमातून पांढरी आणि पिवळी शेवंती , झेंडू , अष्टर , अशी फुले घेऊन सजावटीचे कामकाज सुरू होते. आमच्या वडिलांपासूनही सेवा सुरू आहे. आता काम करत आहेत. आमच्यासह मुस्लिम समाज बांधव देखील खांद्याला खांदा लावून सेवा अर्पण करतात. त्यामुळे एक सामाजिक एकता आणि अखंडता दिसून येते..

मंजुनाथ , फुलांचे व्यापारी सोलापूर मार्केट यार्ड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *