मरगळलेल्या शहर शरद राष्ट्रवादीला साहेब देणार का उभारी…पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यांच्या नजरा….

मरगळलेल्या शहर शरद राष्ट्रवादीला साहेब देणार का उभारी…!

 कार्यकर्त्यांच्या लागल्या नजरा  ?

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१० एप्रिल

राजकारणातील चाणक्य म्हणून ख्यातनाम असलेले माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे शनिवार दि.१२ एप्रिल रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. शनिवारी दुपारी त्यांचे आगमना हॉटेल बालाजी सरोवर येथे होणार आहे. तद्नंतर विजापूर रोडवरील चव्हाण शिक्षण संकुल येथे दलित मित्र, शिक्षण महर्षी चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर शरद पवार हे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समिती तसेच विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे.

     सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (शरद पवार पक्ष) पूर्णपणे वाताहात झालेली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांना आपल्या समवेत घेऊन आपला पक्ष मजबूत केला आहे. त्यामुळे जुन्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नवी उभारी देण्याचे बाळकडू देण्याचे काम राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना करावे लागणार आहे. आगामी महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचे अस्तित्व कायम ठेवण्याचे आव्हान देखील त्यांच्यासमोर असणार आहे. त्यासाठी शरद पवार नेमकी कोणती राजकीय व्यूहरचना आखतात हे पाहणे देखील गरजेचे आहे.

    विधानसभा निवडणुकीत माजी महापौर महेश कोठे यांनी पक्षाला नवी ताकद आणि उभारी देण्याचे काम केले होते. त्याच पद्धतीने आगामी महापालिका निवडणुकीसाठी देखील त्यांनी राजकीय गणित डोळ्यासमोर ठेवून महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी मतांची गोळाबेरीज केली होती. महेश कोठे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाने पक्षांमध्ये एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते. परंतु त्यांच्या आकस्मिक निधनाने शरद पवार यांना सोलापूर मध्ये मोठा धक्का बसला आहे. कोठे यांच्या अचानक जाण्याने पक्षांमध्ये तसेच राजकीय क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याचे काम देखील सर्वेसर्वा शरद पवार यांना करावे लागणार आहे.

जुन्या नव्या कार्यकर्त्यांची सांगड जमणार का मेळ ?

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील जुने कार्यकर्ते अद्यापही शरद पवार यांच्या पाठीशी आहेत. अशा जुन्या व नवीन तडफदार तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शरद पवार यांना आगामी निवडणुकीची खिंड लढवावी लागणार आहे. आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवार जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची सांगड घालून राजकीय पक्षांना आव्हान देण्यासाठी कार्यकर्त्यांना बूस्टर डोस देणार आहेत. शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा छोटेखानी संवाद कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी ते कार्यकर्त्यांना निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय रणनीती आखणार आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रभारी हर्षवर्धन पाटील आमदार शशिकांत पाटील यांचे मार्गदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पश्चिम महाराष्ट्र प्रभारी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे इंडियन मेडिकल असोसिएशन हॉलमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याकरिता तसेच राज्यात युती सरकार मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शेतकरी, कष्टकरी, व महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात वजन मोठ बांधण्यासाठी बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *