शहरात मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या…. घोंगडे वस्ती या गजबजलेल्या ठिकाणाहून झाली मोटरसायकलची चोरी….

गजबजलेल्या ठिकाणाहून मोटरसायकलची चोरी…

चोर सीसीटीव्ही कॅमेरात झाला कैद…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज 

सोलापूर दि. ३० ऑगस्ट – जोडभावी पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील भवानी पेठ, घोंगडे वस्ती येथील हाॅटेल चाणक्य बार समोरील फुटपाथवर लावण्यात आलेली मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे..

     एम.एच. १३ बी.सी.६००५  मोटरसायकल क्रमांकांची हिरो होंडा स्प्लेंडर प्रो कंपनीची मोटरसायकल चोरीस गेली आहे. सदर मोटरसायकल मालक फिर्यादी नामे शिवानंद नागेश येरटे यांनी त्यांचे मित्र गिरीश धनाश्री यांच्या घरी गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गेले होते, रात्री १०.३० वाजता परत आले असता त्यांना मोटरसायकल मिळून आली नाही. शोधाशोध करुन देखील सदरची मोटरसायकल मिळाली नसल्याने, फिर्यादी येरटे यांनी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद दाखल केली.

            दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरात सदरचा चोर कैद झाला असून हा चोरटा इतरत्र निदर्शनास आल्यास तात्काळ जोडभावी पेठ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पो.हे.काॅ. आरेनवरु हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *