रत्नमंजिरी नगरमध्ये विकास कामांची नांदी…..माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या कामाला आले यश..

रत्नमंजिरी नगर येथे ड्रेनेज लाईनचे उद्घाटन ;

माजी नगरसेविका राजश्री अनिल चव्हाण यांचे मानले नागरिकांनी आभार…!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर , दि. १८ सप्टेंबर – माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. प्रभाग क्रमांक २६ मधील रत्नमंजिरी नगरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून ड्रेनेज, पाण्याची पाईप लाईन व अंतर्गत रस्ते अशा मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. २०२१ रोजी येथील नागरिकांनी माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्याकडे तक्रारी मांडल्या होत्या, त्याची दखल घेत प्रथम पाण्याची पाईपलाईन नंतर काँक्रीट रस्ते करून सोई सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. याच विकास कामांचे उद्घाटन माजी नगरसेविका राजश्री चव्हाण , सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण, निवृत्त पोलीस अधिकारी कांबळे , रामचंद्र पवार स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.

           दरम्यान निधी अभावी ड्रेनेजचे काम अपूर्ण राहिले होते. सदरच्या कामाची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत सदर नगरातील ड्रेनेज लाईन मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. यानगरातील पाण्याची पाईपलाईन ,  ड्रेनेजचे काम झाल्यानंतर शासनाच्या मूलभूत सुविधा योजनेअंतर्गत रस्ते लवकरच होणार आहेत, असे माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सांगितले आहे.

शासन दरबारी पाठपुरावा करून विकास कामे केली.

आम्ही नियमितपणे सोलापूर महानगरपालिकेला शंभर टक्के टॅक्स भरत असून देखील आम्हाला सोई सुविधा उपलब्ध होत नाहीत. परंतु माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी आमच्या नगरातील समस्या जाणून घेतल्या. शासन दरबारी पाठपुरावा करून विकास कामे केली आहेत.

– रामचंद्र पवार स्थानिक नागरिक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *