सोलापूर शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी ; १५ मोटार सायकली केल्या हस्तगत 

चोरीच्या ७ लाख ७० हजाराच्या १५ मोटार सायकली केल्या हस्तगत जप्त ;

सोलापूर शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी 

सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर / प्रतिनिधी 

सोलापूर शहरात दिवसेंदिवस मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पथकाद्वारे ( दि. १५) जुलै रोजी गुन्हे शाखेचे साहेब पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे त्यांच्या तपास पथकास मोटरसायकल चोरणाऱ्या गुन्हेगाराचा सुगावा लागला. या आरोपींचा सोलापुर शहर हद्दीत शोध घेत असताना, एक संशयीत इसम चोरी केलेली मोटार सायकल घेवुन, शेळगी रोड, सोलापुर याठिकाणी उभा असल्याची  माहिती तपास पथकास प्राप्त झाली. माहितीचे आधारे, सहाय्यक निरीक्षक धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकाने संशयित इसमास ताब्यात घेतले.

 चोरलेल्या मोटारसायकल बाबत चौकशी केली असता त्याने, त्याचे नाव कृष्णात ऊर्फ अण्णा महादेव डोंगरे ( वय- २५ वर्षे, रा. मु.पो. मंगळुर, ता. तुळजापुर, जि. धाराशिव ) असे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने सोलापुर शहर, लातुर, पुणे, इंदापुर, भिगवण, रत्नागिरी, बिदर (कर्नाटक) येथुन, एकूण १२ मोटार सायकली चोरल्याची कबुली दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे तपास पथकातील पोलीस अंमलदार पोलीस शिपाई धायगुडे यांच्यासह, इतर पोलीस अंमलदारांनी आरोपीकडे कौशल्याने तपास केला असता, त्याने, चोरी केलेल्या एकूण १२ मोटारसायकली हस्तगत केल्या.

तसेच दुसऱ्या एका घटनेत ( दि.०९) जुलै रोजी संशयित आरोपी शुभम भागवत सावंत, (वय २८ वर्षे, रा. चिंचोली, ता. तुळजापुर, जि.धाराशिव, सध्या मुपो. मंगळुर, ता. तुळजापुर, जि. धाराशिव) यास जुना पुणे नाका येथील ब्रिज जवळ, चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले. संशयित आरोपीकडे अधिक चौकशी केली असता सोलापूर शहरामध्ये ०३ मोटार सायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार आरोपीकडून ०३ मोटार सायकली जप्त करत मोटारसायकली चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

        सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे तपास पथकाने, आरोपी कृष्णाथ ऊर्फ अण्णा महादेव डोंगरे व शुभम भागवत सावंत यांना ताब्यात घेवुन, चोरीचे एकूण १५ मोटार सायकली जप्त करत एकूण ०७,७०,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कामगीरी, पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त डॉ.अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अभिजीत धायगुडे, काशिनाथ वाघे, सायबर पोलीस ठाणे कडील अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छींद्र राठोड, यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *