महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली कर्तव्याला तिलांजली
हृद्रयद्रावक घटनेने हळहळले रत्न मंजिरी नगर : मरणानंतरही सोसाव्या लागतायत क्लेशदायक मरण यातना…..
शहराच्या हद्दवाढ भागातील प्रभाग २६ मधील रत्न मंजिरी नगरातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित
सोलापूर व्हिजन
सोलापूर दि १६ ऑगस्ट – सोलापूर शहरातील हद्दवाढ भागातील अनेक समस्या काही केल्या संपेनात , नागरिकांना जिवंतपणे मरण यातना आणि नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. १५ ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रभाग २६ मधील रत्नमंजीरी नगरात मोठ्या प्रमाणात रस्ता नसल्यामुळे संपूर्ण नगर चिखलमय झाले होते. त्यातच तेथील रहिवाशी दादा शेखु गवळी यांचे निधन झाले होते परंतु घरासमोरील रोडवर डांबरी रोड नसल्यामुळे चिखलातच सदर मयत इसमाचे अंतिम कार्यक्रम करून त्यांची तिरडी चिखलातच बांधली जात होती. असे हृदयद्रावक विदारक चित्र दिसून आले.
यावेळी तेथील नागरिक यांनी ही बाब प्रभागाच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सांगितल्यानंतर त्यांनी लागलीच सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली-उगले आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांना कळवूनही काहीच उपाययोजना होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान महापालिकेच्या झोन अधिकाऱ्यांनी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याला तीलांजली दिल्याबद्दल नागरिकांतून सोलापूर महानगरपालिका विषयी प्रचंड नाराजी उफाळून येत आहेत. आयुक्त यांना स्वतःचे ऑफिस व घरासाठी नुतनीकरण करण्यासाठी पालिकेतून निधी उपलब्ध होतो. परंतु जे नागरिक टॅक्स स्वरूपात महापालिकेला इमाने इतबारे टॅक्स भरूनही त्यांना मूलभूत सुविधा पासून वंचित राहावे लागत आहे. ही शोकांतिका बनत आसून स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढत संतप्त व्यथा मांडल्या आहेत.
एकंदरीत भविष्यात विकासकामे मार्गी लागली नाहीतर यापेक्षाही उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी दिला आहे.