स्मार्ट रस्त्यांवर अस्वच्छतेचे साम्राज्य ; महापालिका प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष….

स्मार्ट शहरातील स्मार्ट रस्त्यांवर अस्वच्छतेचे साम्राज्य ; महापालिका प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष….

सर्वत्र अस्वच्छता 

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि २५ जुलै – सोलापूर शहरात जागोजागी तसेच रस्त्याच्याकडेला नेहमीच अस्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे. स्मार्ट सिटी सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य वाढवून रोगराईला आमंत्रण मिळत आहे.

   स्मार्ट सिटीतील स्मार्ट रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग अस्वच्छता आणि दुर्गंध पसरलेली आहे. शहरातील हातवाड भागात हे दृश्य दिसून येते. रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पडलेले कचऱ्यांचे ढीग आणि चिखल यामुळे पावसाळ्यात वायरल इन्फेक्शन आणि ताप सर्दी खोकला अशा विविध संसर्गजन्य रोगराईला चालना मिळत आहे. महापालिका प्रशासनाचे या ठिकाणी दुर्लक्ष होताना दिसत आहे.

शहरातील विविध भागात घंटागाड्यांचा अभाव आहे. वेळेवर घंटागाडी येत नसल्याने नागरिक कचऱ्याचे ढीग रस्त्याच्या कडेला रिकामे करतात. यामुळे मोकाट जनावरे यांचा देखील उच्छाद वाढला आहे. चिखल कचरा यामुळे सर्वत्र स्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे. अशा अवस्थेतच नागरिकांना दिवस काढावे लागत आहेत.

   महापालिकेचे संबंधित विभागीय अधिकारी , स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचारी यांचे प्रभागात सर्वेक्षण नसल्याने जागोजागी कचऱ्याचे ढीग आणि अस्वच्छता दुर्गंधी दिसून येते. रोजच्या रोज कचरा संकलन आणि स्वच्छता ठेवल्याने पावसाळ्यात रोगराईला आळा बसणार आहे. मात्र याकडे प्रशासनासह अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

          घंटागाडी कर संकलनासाठी वेळेवर दाखल होत नाही असे कारण नागरिकांकडून सांगण्यात येतं. शहराच्या हद्दवाढ भागात नेहमीच ही ओरड असते. त्यामुळे नागरिक वैतागून रस्त्यावरच कचरा टाकतात. यामुळे विविध रोगराईला निमंत्रण मिळत आहे. रस्त्याच्या कडेला आणि इतरत्र आस्वच्छता पसरल्याने रस्त्याच्या कडेला येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांना देखील या अस्वच्छतेचा आणि दुर्गंधीचा नाहक त्रास करावा लागत आहे. महापालिकेच्या संबंधित विभागीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यामध्ये स्वच्छता ठेवावी अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

बापूजी नगर रस्त्यावर नेहमीच अस्वच्छता आणि दुर्गंधी असते. या रस्त्यावरून जाताना नेहमीच विविध प्रकारच्या समस्या भेडसावतात. शाळेला जाणाऱ्या मुलांना नेहमी या अस्वच्छतेचा आणि दुर्गंधीचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात संसर्गजन्य आजार पसरत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे.

– स्थानिक नागरिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *