सोलापूर धर्मादाय उपआयुक्त कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी नाही

सोलापूर धर्मादाय उपआयुक्त कार्यालयात पूर्णवेळ अधिकारी नाही 

शहर जिल्ह्यातील नागरिकांना हेलपाटे मारून आर्थिक भुर्दंडासह होतोय मानसिक त्रास ; रिक्त पदे तात्काळ भरण्यासाठी पत्राद्वारे केले निवेदन…

सोलापूर व्हिजन

सोलापूर दि १० जुलै – सोलापूर येथील धर्मादाय उपआयुक्त तथा सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामध्ये रिक्त अधिका-यांची पदस्थापना करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते पै.माउली हेगडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (विधी व न्याय ) यांना निवेदन दिले आहे.

                             सोलापूर येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील प्रमुख अधिकाऱ्यांचे दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे मागील तीन ते चार महिन्यांपासून याकार्यालयाशी संबंधित काम असणाऱ्या विश्वस्त, संस्था, प्रतिनिधी,सदस्यांसोबत सर्वासामान्य जनतेस याचा त्रास होत आहे. प्रमुख अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे प्रमुख सुनावण्या पुर्ण होत नाहीत.नवीन सामाजिक संस्थांच्या नोंदणी  रखडल्या आहेत.अनेक तक्रारीच्या सुनावण्या होत नाहीत. त्यामुळे महत्वाचे निर्णय होत नाहीत.

                        दरम्यान सोलापूर येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील प्रमुख जबाबदार अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे,दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे काही प्रमाणात कामकाज खोळांबले आहे. कार्यालयातील कर्मचा-यांवर वचक नसल्यामुळे,विश्वस्थ संस्था प्रतिनिधी/सदस्यांसोबत सर्वसामान्य जनतेस त्रास सहन करावा लागत आहे.ही रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री (विधी व न्याय ) यांच्याकडे निवेदन पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *