भाजपच्या बालेकिल्ल्यात महेश कोठेंना मिळतोय मोठा प्रतिसाद  ! घुमला तुतारीचा आवाज..

भवानी पेठ शाहीर वस्ती मध्ये घुमला तुतारीचा आवाज..

भाजपच्या बालेकिल्ल्यात महेश कोठेंना मिळतोय प्रतिसाद

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दी.१३ नोव्हेंबर –

विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात सुरू आहेत. शहरात निवडणुकीची रंगत अधिक वाढत चाललेली आहे. त्याच अनुषंगाने सोलापूर शहर उत्तर मतदार संघात विधानसभा निवडणुकीची चुरस वाढली असून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे हे तुतारी चिन्हावर लढत आहेत, महेश कोठे यांच्यासारखा उमेदवार मिळाल्याने प्रत्येक भागात त्यांना मोठ्या प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात देखील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महेश कोठे यांना मिळत असल्याने सध्या महेश कोठे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह वाढला आहे

   दरम्यान बुधवारी सकाळी प्रभाग तीन मध्ये महेश कोठे यांची पदयात्रा निघाली यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक पादयात्रेत सहभागी झाले होते, ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. वीस वर्षाच्या खुंटलेल्या विकासामुळे आम्ही महेश कोठे यांच्यासोबत असून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार बीआरएस पक्षाचे नागेश वल्याळ यांनी व्यक्त केला.

गेल्या वीस वर्षांत विजयकुमार देशमुख यांनी कोणतेही काम केले नाही, साधी कांडप मशीन आणू शकले नाहीत, विविध पदाचे मंत्री होते, विजयकुमार देशमुख यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याने नागरिक चिडून आहेत त्यामुळे यंदा शहर उत्तर महेश कोठे याना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार असल्याचे भाजप चे सुरेश पाटील म्हणले

तर जे म्हणत होते हा माझा बालेकिल्ला आहे त्यांनी आता पाहावं, लोकांनी  दाखवून दिलं आहे, या भागातील लोकांची वीस वर्षे फसवणूक झाली, त्यामुळे आता लोकांनी ठरवलं आहे, या भागातील त्यांच्याच पक्षातील संजय कोळी या नगरसेवकांनी विजयकुमार देशमुख यांना सांगितले होते इथे बेरोजगारी खूप आहे, आमच्या भागातील मुलांना काम लावा पण विजयकुमार देशमुख यांनी त्यांचं देखील ऐकल नाही त्यामुळे यंदा शहर उत्तर मध्ये बदल दिसणार आणि मोठ्या मताधिक्याने जनता मला निवडून देईल असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *