बाळीवेसेत घुमला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी चा आवाज!
खासदार सुप्रिया सुळे यांनी महेश कोठेंना दिली कौतुकाची थाप सभेला तुफान गर्दी
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१८ नोव्हेंबर –
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. आज प्रचाराचा शेवट दिवस असल्याने प्रत्येक उमेदवार आपली शेवटची सभा निर्णायक आणि पाडणारी करण्यात व्यस्त होता. त्याचा अनुषंगाने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचाराची सांगता सभा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विजयी चौकात पार पडली.या सभेला खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान आपल्या सभेला सुरुवात करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. निवडणूक सोपी नाही पण आपला गडी पण भारी आहे. म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी महेश कोठेना कौतुकाची थाप दिली, आता काही विरोधक आमिष दाखवतील, चहा देतील, एक नाही दोन्ही हातानी घ्या, ते पन्नास खोक्याचे सरकार आहे, ते काही स्वतःकडच देत नाहीत आपले घेऊन परत आपल्याला देत आहेत, त्यामुळे सर्वांनी महेश कोठे यांना निवडून ध्या म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारीचा नारा दिला.
यावेळी सुरेश पाटील यांनी आपल्यावर कसा अन्याय झाला याचा पाढाच वाचून दाखविला, तसेच शहर उत्तर च्या आमदारांनी हिंदू मुस्लिम सह लिंगायत समाजातील एक तरी युवकाला नोकरी लावली का असा सवाल उपस्थित केला.
यावेळी भर उन्हात देखील सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. व्यासपीठावर सुधीर खरटमल, महेश गादेकर, मनोहर सपाटे, पद्माकर काळे, माजी नगरसेवक सुरेश पाटील, नागेश वल्याळ, महादेव चाकोते, उदयशंकर चाकोते, बिज्जू प्रधाने, प्रथमेश कोठे, अक्षय वाकसे, सुनीता रोटे, प्रतीक्षा चव्हाण, यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते