कोठेंच्या संपर्क कार्यालयासमोर देशमुखांचे जंगी स्वागत
प्रभाग क्र. ४ मध्ये भाजपाच्या पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शहर उत्तर मध्ये पुन्हा एकदा फुलणार ‘कमळ’

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्यूज,
सोलापूर दि.१५ नोव्हेंबर –
सोलापूर – महायुती उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली होती. ही पदयात्रा तुळजापूर वेस येथील कोठेंच्या संपर्क कार्यालयासमोर विजयकुमार देशमुखांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी विविध घोषणा दिल्या.

गुरुवार सकाळी शहर उत्तर मतदार संघातील भाजप माहितीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ४ मध्ये पदयात्रा काढण्यात आली. त्यास लोकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

ह्या पदयात्रेची सुरुवात श्री शिवगंगा मंदिरापासून करण्यात आली. पुढे जाऊन ही पदयात्रा मराठा वस्ती, काशी कापडी गल्ली परिसर, बुधले गल्ली, बोरामणी तालीम, शिवानुभव मंगल कार्यालय आदि परिसरातून काढण्यात आली. फटाक्यांची आतिषबाजी करीत ढोल ताश्यांच्या निनादात, फुलांची उधळण करत माता भगिनींकडून औक्षण करून या पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
गेल्या चार टर्म आमदार असणारे विजयकुमार देशमुख यावेळीही निवडणुकीत सहभागी आहेत. भाजपचा हा बालेकिल्ला अभेद्य आणि कायम राहिल ह्यात शंका नाही. येणाऱ्या विधानसभेत देशमुख आमदार असतील, कदाचित भाजपा सरकार आले तर, ते मंत्री म्हणून सुद्धा सोलापूर शहराला नावारूपाला येतील. लाखोंच्या मताने विजय देशमुख निवडून येतील अशी भावना जगदीश पाटील यांनी व्यक्त केली.
प्रभाग क्रमांक ४ मधून भाजपच्या पदयात्रेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता. यावेळी पाचव्यांदा विजयकुमार देशमुख आमदार होतील यात काही शंका नाही. विरोधक काहीपण बोलूदेत पण विजयकुमार देशमुख हे निवडून येणारच. येणाऱ्या विधानसभेत देशमुख टॉप १० आमदारात दिसतील. आणि त्यांना कॅबीनेट मंत्री पद मिळावे. अशी भावना गोपाळ झवंर यांनी व्यक्त केली.
विजयकुमार देशमुख हे विकास पुरुष आहेत. आजची पदयात्रा विकासाच्या जोरावर निघाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिक यात्रेत स्वइच्छेने सहभागी झाले होते. त्यामुळे देशमुख हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असे श्रीशैल शेटे यांनी सांगितले.
या पदयात्रेत भाजपा नेते अनंत जाधव, अजित गायकवाड, राजाभाऊ काकडे, विनायक विटकर, सचिन कुलकर्णी, संतोष खंडेराव, जगदीश पाटील, नागेश येळमेळी, माजी नगरसेविका सुरेखा काकडे, उषा हब्बू, वंदना गायकवाड, गणेश जाधव, माजी नगरसेवक अमित पाटील, बसवराज सावळगी, श्रीशैल शेटे, चेतन्य म्हमाने, शुभम, सोनसळे, आतिष टोसमाने, रूपेश कर्पेकर, गोपाळ सोमानी, नवनीत अट्टल, राजकुमार तमशेट्टी, मल्लिनाथ मठपती, गिरीष म्हमाने, गिरीश अक्कलकोटे, प्रकाश रेशीमकर, नागेश जाजी, गणेश कालेकर, दास पतंगे, अझरोद्दीन शेख, विक्रांत लांबकाने आणि परिसरातील नागरिक बंधू – भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.