शहर उत्तर मध्ये भाजपने राखला गड ! कोठेंचा दारुण पराभव करत केली ऐतिहासिक विजयाची नोंद !

शहर उत्तर मध्ये भाजपने राखला गड ! कोठेंचा दारुण पराभव करत केली ऐतिहासिक विजयाची नोंद 

विजयकुमार देशमुख पाचव्यांदा विजयी ; लाडक्या बहिणी ठरल्या विजयाच्या शिल्पकार …

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.२३ नोव्हेंबर –

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विजयकुमार देशमुख यांनी सलग पाचव्यांदा विधानसभा निवडणूक जिंकून त्यांनी विजयाचा विक्रम गाठला आहे. यंदा राज्यात वारे फिरले आहे. प्रस्थापितांना जोरदार धक्का देणार अशा माध्यमातून प्रचार केला गेला. मात्र याला मतदारांनी नाकारून सत्ताधारी आमदारांना आणि भारतीय जनता पार्टीला विजयी केले. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार देशमुख यांनी आपल्या विजयाचा पंच करून विजयश्री खेचून आणली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांचा दारुण पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे.

दरम्यान या विजयामध्ये लाडक्या बहिणींचा रोल महत्त्वाचा आणि मोठा ठरला आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने महिलांना पंधराशे रुपयांचे आर्थिक मदत देऊ करून, महिलांना स्वतःच्या पायावर उभा केले आहे. ही योजना राज्यात प्रभावी ठरली. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्याच पद्धतीने स्थानिक सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात हेच चित्र दिसून आले. यंदा बदल होईल, असे वाटत होते परंतु, लाडक्या बहिणींनी महायुती आणि पर्यायाने भाजपला पुन्हा एकदा सत्तेवर बसवले आहे.

दुसरीकडे विजयकुमार देशमुख यांच्या विजयामध्ये सर्व समाज बांधवांचा मोठा हात दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला होता. त्यानुसार शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कानाकोपऱ्यात जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात आली. दलित आंबेडकरी समाज आणि सर्वसमावेशक मत विजय मालकांना पडल्याने त्यांचा विजय निश्चित झाल्याचे आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.तर दुसरीकडे माजी नगरसेवक डॉ.किरण देशमुख यांनी देखील वीस वर्षांच्या कामांची ही पोचपावती जनतेने दिल्याचे सांगितले. एकंदर शहरातील शहर उत्तर, शहर मध्य आणि शहर दक्षिण, तसेच अक्कलकोट, मंगळवेढा पंढरपूर या विधानसभा मतदारसंघात भाजपने कमळ फुलवल्याने जिल्हा आणि शहर भाजपमध्ये झाल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *