शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात निर्णायकक्षणी फिरत आहे निवडणुकीचे वारे ?
गवळी समाजासह विविध सामाजिक संघटनांनी दिला महेश कोठे मोलाचे पाठबळ…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१५ नोव्हेंबर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि महायुती तर दुसरीकडे विरोधक महाविकास आघाडी यांच्यात जोरदार लढत पहावयास मिळत आहे. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ नेहमीच भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या बालेकिल्लाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठे आणि महाविकास आघाडीकडून लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
गेल्या वीस वर्षांचा हिशोब मागताना महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. शहराचा विकास, विविध उद्योग व्यवसाय, बेरोजगारी अशा विविध माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. दरम्यान अशाच निर्णयाकक्षणी प्रतिस्पर्धी उमेदवार महेश कोठे यांना समाजातील विविध स्तरातून मोठया प्रमाणात पाठींबा वाढू लागला आहे. सुशील रसिक सभागृह येथे महेश कोठे यांना मोलाचे पाठबळ देण्यासाठी युवकांची तसेच आबालृद्ध नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पदयात्रा, कॉर्नर बैठकाच्या माध्यमातून महेश कोठे हे मतदारांपर्यत पोहोचण्यात यशस्वी झाल्याचे यावरून दिसत आहे.
दरम्यान शहरातील गवळी समाजातील सदस्यांनी तसेच विविध सामाजिक संघटनांनी महेश कोठे यांना आपल्या समस्यांचा पाढा वाचून दाखवत यंदा क्षार उत्तर मध्ये चित्र बदलेल असा आशावाद व्यक्त केला आहे. गवळी समाज अंतर्गत येणारे श्रीमहालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, सीदाजी आप्पा सोलापूर सामुदायिक विवाह संस्था, अखिल गवळी समाज महासंघ, सोलापूर गवळी समाज कृती समिती, श्री शिवपार्वती प्रतिष्ठान, श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन,अप्पाश्री प्रतिष्ठान आदींसह राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, सोलापूर वडार समाज संस्था, जय मल्हार तालीम संघ, श्री मडीवाळेश्वर माचदेव परीट युवक कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था, छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान, मल्हार प्रतिष्ठान, १४ एप्रिल बॉईज, निवृत्त कर्मचारी समन्वय समिती, सत्यशोधक बहुजन आघाडी, शिवराणा प्रतिष्ठान, नाथपंथी डवरी गोसावी समाज बहुउद्देशीय संस्था, सोलापूर शहर जिल्हा ऑटो रिक्षा संघटना, आदी संघटनांनी महेश कोठे यांच्या सोबत राहण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला आहे..