शहर उत्तर चा विकास करण्यासाठी कोठे यांना साथ द्या :- तेलंगणा सी.एम रेवंत रेड्डी 

शहर उत्तर चा विकास करण्यासाठी कोठे यांना साथ द्या :- तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डी 

स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ :- महेश कोठे 

महेश अण्णांना आमदार करण्यासाठी एकवटला घरकुल परिसर..

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. १८ नोव्हेंबर –

सोलापूर शहर उत्तर मतदार संघाचा विकास करायचा असेल तर महेश कोठे यांना निवडून देण्याचे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी विडी घरकुल परिसरामध्ये आयोजित केलेल्या सभेमध्ये केले. पुढे बोलताना रेड्डी म्हणाले की, जर उत्तर विधानसभा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिलेला आहे. या उत्तरचा विकास करण्यासाठी महेश कोठे यांना साथ द्या असे सांगितले.

  दरम्यान विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला असल्याने प्रचारात अधिकच चढा ओढ लागलेली दिसत आहे. महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. याच पार्श्वभूमीवर विडी घरकुल परिसरात महेश कोठे यांच्या प्रचारार्थ तेलंगनाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार प्रणिती शिंदे, उमेदवार महेश कोठे, शहराध्यक्ष सुधीर खटमल आजींची उपस्थिती होती.

 यावेळी बोलताना महेश कोठे यांनी घरकुल वासीयांशी संवाद साधला, गेल्या वीस वर्षांपासूनची भाकरी करपली आहे, आता भाकरी बदलण्याची वेळ आली आहे, स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांचे स्वप्न आमदार होण्याचे स्वप्न होते पण काही कारणामुळे ते पूर्ण होऊ शकले नाही, तात्या कोठे यांचे स्वप्न मी जगत आहे, त्यामुळे तात्या कोठे यांचे यांचे स्वप्न करण्यासाठी घरकुल वासीयांनी मला साथ द्या अशी भावनिक साद महेश कोठे यांनी घातली, यावेळी घरकुल परिसरातील नागरिकांनी एकसंघ राहून महेश कोठे याना आमदार करण्याचा निश्चय केला, घरकुल परिसराचा विकास फक्त आणि फक्त महेश कोठे यांनीच केला असून यंदा महेश कोठे यांना आमदार करणारच असा निश्चय घरकुल वासीयांनी केलाया सभेवेळी घरकुल परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *