शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात वीस वर्षांपासून काहीही सुधारणा नाही ; केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे टीकास्त्र ;
महेश कोठे यांना निवडून देण्याशिवाय पर्याय नाही.
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१६ नोव्हेंबर –
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी आणि विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट यांच्या नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडत आहे. त्याच अनुषंगाने शनिवारी रात्री माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची शेळगी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शिंदे यांनी आपल्या भाषणातून विजयकुमार देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडले. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात गेल्या वीस वर्षांपासून सर्व काही आहे तसेच आहे. कोणतीही सुधारणा झाली नाही, जो माणूस सकाळी जाऊन सही करतो, दुपारी कँटीन मध्ये जातो आणि संध्याकाळी घरी जातो अशा माणसाला पाच वर्षे निवडून देणार का ? कधी डोळे उघडून हद्दवाढ बघितलं नाही, सोयी सुविधा बघितल्या नाहीत, लोकांच्या पाण्याचा प्रश्न बघितला नाही, अशी टीका आमदार विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता केली त्यामुळे आता महेश कोठे याना निवडून द्या असे आणि विकासाची तुतारी वाजवा असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
यावेळी चाकोते, सुरेश पाटील, मनोहर सपाटे, नागेश वल्याळ, उदयशंकर चाकोते, भारती इप्पलपल्ली यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठया संख्यने उपस्थित होते.