भाजप सहविरोधकांना भरली धडकी ; उत्तर मध्ये परिवर्तन निश्चित :- खा. प्रणिती शिंदे
महेश कोठे यांच्या प्रचारार्थ उतरल्या मैदानात…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१४ नोव्हेंबर –
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वारे चांगले वाहू लागले आहे. सोलापूर शहर उत्तर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु यंदाचा मौसम पाहता हा बालेकिल्ला ढासळतो की काय असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे? कारण महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार संपूर्ण ताकदिनिशी या निवडणुकीत उतरलेले दिसत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, महाविकास आघाडीचा प्रचार पाहून भाजप उमेदवारांना धडकी भरली, महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पदयात्रेत खासदार प्रणिती शिंदे या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना शहर उत्तर मतदार संघातून दिवसेंदिवस नागरिकांचा पाठींबा वाढत चालला आहे. याचेच अर्थ की शहर उत्तर आता परिवर्तन घडवत आहे. त्यासाठी जनतेने पुढाकार घेतला आहे असेही शिंदे या म्हणाल्या.

दरम्यान मतदानासाठी अवघे काही दिवस राहिले असून प्रचार चांगलाच तापला आहे, होम टू होम, पदयात्रा कॉर्नर बैठका मधून महेश कोठे हे मतदारांच्या घरोघरी जात आहेत, दरम्यान गुरुवारी सकाळी प्रभाग क्रमांक एक मध्ये महेश कोठे यांच्या पदयात्रेला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, या पदयात्रेत महेश कोठे यांच्यासोबत खासदार प्रणिती शिंदे ह्या देखील सहभागी झाल्या होत्या,यावेळी ठिकठिकाणी महेश कोठे यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश कोठे यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, जे लोक आजपर्यंत सांगत होते आमची व्होट बँक आहे त्या मारवाडी समाजाचा देखील आज मला आशीर्वाद मिळाल्याचे त्यांनी सांगितले.एखादा माणूस नगरसेवक होऊन विकास करू शकतो तर आमदार झाल्यावर किती विकास करू शकेल, यंदा च्या वर्षी आपल्याला बदल घडवण्याचीसंधी मिळाली असून या संधीच सोन करू असे या भागातील नागरिक म्हणाले