यंदाची निवडणूक जनतेने हातात घेतली ; शहर उत्त्तरमध्ये परिवर्तन अटळ
बाळे भागातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१३ नोव्हेंबर –
विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून गेल्या महिन्याभरात प्रचारात सत्ताधारी व विरोधी उमेदवार एकमेकांवर कुरघोडी करत आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. तमाम जनतेचे लक्ष लागून राहिलेले सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार हे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. महेश कोठे यांना शहर उत्तर मधील सर्वच भागातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी महेश कोठे यांचे औक्षण करून पुष्पहार घालून रांगोळ्या काढून स्वागत करण्यात येत आहे.
दरम्यान महेश कोठे यांच्या सर्वच पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, बुधवारी सायंकाळी बाळे भागात महेश कोठे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली, ही पदयात्रा बाळे कॉर्नर, पुष्पक हॉटेल, संतोष नगर, अंबिका नगर, क्रांती मित्र मंडळ, नामदेव शिंपी सोसायटी, बाळे गावठाण, खडक गल्ली, खंडोबा मंदिर, मारुती मंदिर भीमनागर आदी परिसरातून काढण्यात आली, यावेळी ठिकठिकाणी महेश कोठे यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महेश कोठे म्हणाले यंदाची निवडणूक जनतेने हातात घेतली आहे, गेल्या वीस वर्षात मागील आमदाराने कोणतेही काम केली नाही त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड राग आहे, त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे महेश कोठे म्हणाले.