यंदा परिवर्तनाची लाट ; शहर उत्तर मध्ये होणार बदल – महेश कोठे
महेश कोठे यांची प्रभाग चार परिसरामध्ये भव्य पदयात्रा संपन्न !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.११ नोव्हेंबर – सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोठे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. प्रचार कार्यक्रम सुरू झाल्यापासून पदयात्रेचा धडाका महेश कोठे यांनी लावला आहे. यंदाची निवडणूक ही नागरिकांनी आपल्या हातात घेतली आहे. त्यामुळे यंदा परिवर्तनाची लाट असल्याचे महेश कोठे यांनी सांगितले. सोमवारी प्रभाग क्रमांक ४ मधील परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. शहरातील वडार गल्ली येथून या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. ठिक ठिकाणी पदयात्रेची स्वागत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढत असून बी.आर.एस आणि सुरेश पाटील उघडपणे माझा प्रचार करत असल्याचं त्यांनी सांगितले. ३० वर्षांनी काहीच कामे न केल्याने विजय देशमुख यांना बोलायला मुद्दे च नाहीत तरुणाई मध्ये नाराजी असून यंदा उत्तर मध्ये परिवर्तनाची लाट असल्याचं महेश कोठे म्हणाले.
दरम्यान यावेळी महेश कोठे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीविहार प्रेरणाभूमीला भेट देऊन अभिवादन केलं. सदरची पदयात्रा वडार गल्ली,मिलिंद नगर,स्विपर्स कॉलनी, मुकुंद नगर,जम्मा चाळ, मराठा वस्ती,शिवगंगा मंदिर,बुधले गल्ली, महादेव गल्ली,वारद बोळ मार्गे भडंगे गल्ली येथे पदयात्रेची सांगता झाली.या पदयात्रेत कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.