कधी काँग्रेस, कधी शिवसेना अन् आता तुतारी वाजवत बसलेत …..

महापालिका लुटणाऱ्यांना जागा दाखवा  – आ.विजयकुमार देशमुख

कधी काँग्रेस, कधी शिवसेना अन् आता तुतारी वाजवत बसलेत….

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१६ नोव्हेंबर – 

विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आता चांगलीच रस्सीखेच सुरू झाली आहे. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात देशमुख विरुद्ध कोठे यांच्यात टफ फाईट सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजपने विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार विजय देशमुख यांनी सभेत बोलताना म्हणाले की, कोठे हे कधी काँग्रेस, कधी शिवसेना अन् आता तुतारी वाजवत बसलेत. सोलापूरकरांना फक्त वेड्यात काढण्याचे काम ते करत आहे. महापालिका लुबाडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या अशी टीका विजयकुमार देशमुख यांनी केली.

   महायुती उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन समाधान आवळे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी बोलताना महायुती उमेदवार विजयकुमार देशमुख बोलत होते. पुढे ते म्हणाले , या भागाचे गेल्या १५ वर्षांपासून मी नेतृत्व करत आहे. सुरवातीला या भागात काम करताना खूप अडचणी येत होत्या. परंतु तरीही ३ नगरसेवक येथून निवडून आणली. आता पर्यंत मातंग वस्ती साठी मी कोट्यवधींचा निधी आणला आहे. स्वाती समाधान आवळे गेल्या ५ वर्षांपासून माझ्या सोबत काम करत आहेत. सरकार दरबारी भांडून आम्ही आपल्यासाठी निधी आणण्याचा प्रयत्न करु. पुढे बोलताना म्हणाले, विरोधकांनी संविधान बदलण्याची खोटी अफवा केली. कुण्याचा बापात हिंमत नाही संविधान बदलण्याची. अफवांवर विश्वास ठेवू नका भाजप संविधानाचे पालन करणारा पक्ष आहे.

देशमुख म्हणाले,ह्यांनी भाजपावर बोलू नये. आधी काँग्रेस नंतर शिवसेना अन् आता तुतारी वाजवत बसलेत. आता पर्यंत त्यांनी फक्त महापालिका लुटण्याचे काम केले. महापालिका लुबाडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन देशमुख यांनी नागरिकांना केले. विरोधकांना फक्त टीका करता येते, विकास करता येत नाही. पण आम्ही नक्की या भागाचा विकास करु पंतप्रधान आवास योजनेतून नक्कीच पक्की घरी देण्याचा शब्द यावेळी बोलताना विजयकुमार देशमुख यांनी मतदारांना दिला.

      समाधान आवळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,आमच्या अनेक भगिनी हजार पंधराशे रुपये साठी अनेक घरांमध्ये धुणी भांडी करतात. महायुती सरकारने प्रत्येक महिलेचा सन्मान केला आहे. पंधराशे रुपये लाडकी बहिणीच्या माध्यमातून प्रत्येक परिवाराला आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न हे सरकार करीत असून आपण पण मुख्य प्रवाहात येऊन भाजपच्या मागे आपली शक्ती द्यावी. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता काळात आपल्या दलित वस्ती मध्ये सुधारणा झाली नाही. कोणता निधीही आला नाही. मात्र तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कोट्यावधी निधी आणून विकास करून आणला आहे. आमदार देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून देण्याच आवाहन यावेळी समाधान आवळे यांनी केलं.यावेळी व्यासपीठावर अनंत जाधव, दशरथ कसबे, माजी नगरसेविका स्वाती आवळे, समाधान आवळे, यांच्यासह आयोजक यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *