वेळ पडली तर देशमुख मालकांसाठी रक्त सांडू ; बाळे येथील कॉर्नर सभेत चंदनशिवे यांनी दिला शब्द..
आ. विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ बाळे भागातील मारुती गल्ली येथे कॉर्नर सभेचे आयोजन..
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१६ नोव्हेंबर –
दररोज पक्ष बदलणाऱ्यांनी आम्हाला विकास कामे शिकवू नये, अशी टीका आनंद चंदनशिवे यांनी महेश कोठेंवर बाळे येथील कॉर्नर सभेत केली. महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ बाळे भागातील मारुती गल्ली येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते, पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादी बाळे गावाला बाळे शहर करण्यात विजयकुमार देशमुखांचे मोठे योगदान आहे. आतापर्यंत कोणत्याही नेत्याने बाळे भागाला इतका निधी दिला नाही तेवढा मालकांनी दिला. पुढे चंदनशिवे म्हणाले, बुधवार पेठ मधून आनंद चंदनशिवे आणि बाळे भागातून गणेश पुजारी तुमचा प्रचार करत आहेत. ह्या गोष्टीची नागरिकांमध्ये चर्चा आहे, परंतु मालक आम्ही दोघेही प्रामाणिकपणे तुमचा प्रचार करत आहोत. जर वेळ पडली तर मालक आम्ही तुमच्यासाठी आमचे रक्त देखील सांडू असा शब्द चंदनशिवे यांनी बाळे येथील कॉर्नर सभेत दिला.
यावेळी बोलताना महायुती उमेदवार विजयकुमार देशमुख म्हणाले, महायुती सरकारने सगळ्या लाडक्या बहीणींना भावाच्या जवळ केलं. विरोधकांनी चुकीचा प्रचार केला परंतु, लोकसभेला तुम्ही शहर ३६ हजार मतांचा लीड दिला त्यामुळे मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. जेव्हा पासून मोदी सरकार आलं तेव्हा पासून देश विकासाच्या मार्गावर जात आहे. देशातील पहिला वंदे भारत रेल्वे सोलापूरातून धावली, याचा सोलापूरकर म्हणून गर्व वाटतो. पुढे बोलताना देशमुख म्हणाले, पुन्हा सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना १५०० रुपये नाही तर २१०० रुपये देऊ. विरोधकांकडून ३ हजार रुपये महिलांना देण्याचा अपप्रचार केला जात आहे. त्याला माझ्या लाडक्या बहीणींनी बळी पडू नये असे आवाहन देशमुख यांनी केले. बाळे भागाला हद्दवाढ भाग म्हणून ओळखले जात होते, ह्या भागातील नागरिकांना रस्ते, ड्रेनिज, लाईट कोणतीही सुविधा नव्हती, मी पालकमंत्री झाल्यावर सरकार दरबारी भांडून निधी आणला आणि आपल्या बाळे भागाचा विकास केला.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे संयोजक गणेश पुजारी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, पाचव्यांदा मालकांना विधानसभेत पाठवायचे आहे, त्यामुळे लाडक्या बहीणींनी आणि भावांनी विजयकुमार देशमुख यांना भरघोस मताधिक्यानं निवडून द्या. महायुतीचे सरकारचं सर्वसामान्यांना न्याय देऊ शकते. आतापर्यंत हद्दवाढ भाग म्हणून ओळख असलेल्या बाळे भागाचा कोणीही विकास केला नाही. मात्र तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी कोट्यावधी निधी आणून विकास करून आणला आहे. आमदार देशमुख यांना भरघोस मतांनी निवडून देण्याच आवाहन यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी केलं.यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार, अमर पुदाले, आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, आनंद मुस्तरे, शेरनाथ मोकाशी, औदुंबर तीर्थकर, गोरख ठाकर, शशिकांत पाटील यांच्यासह आयोजक यांची प्रमुख उपस्थिती होती.