समाजघटकांना सोबत घेऊन जाणारे सुसंस्कृत नेतृत्व आ.विजयकुमार देशमुख – राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार
दमानी नगर परिसरात राष्ट्रवादीची महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ काॅर्नर सभा
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१६ नोव्हेंबर –
महायुती सरकारने गेल्या दहा वर्षांत विविध योजनेच्या माध्यमातून वंचित घटकाला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा काया पालट केला आहे. असे मनोगत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले. महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दमानी नगर परिसरात काॅर्नर सभेचे आयोजन राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांच्या नेतृत्वाखाली सरचिटणीस शामराव गांगर्डे यांनी केले होते.यावेळी ते बोलत होते.
दरम्यान महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या मनोगतात विरोधक केवळ पोकळ आश्वासने देतात आपण न बोलता प्रत्यक्षात विकासावर भर देतो आणि याच कामाची पोचपावती म्हणून आपण मतदारांनी मला सलग चारवेळा लोकसेवेची संधी दिली आहे.
विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका, असे आवाहन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, आनंत जाधव,आनंद मुस्तारे,शशिकांत बापू कांबळे,प्रा.श्रीनिवास कोंडी आदींनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, माजी नगरसेवक अनंत जाधव,सुनील खटके, संगीता जोगधनकर, चित्रा कदम,कांचन पवार,प्राजक्ता बागल,शशिकांत कांबळे, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, महेश निकंबे, अमीर शेख,प्रकाश झाडबुके आदी उपस्थित होते.