धनगर समाजाचा महायुतीचे उमेदवार विजय देशमुख यांना एक मुखी जाहीर पाठिंबा
धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटीबद्ध विजय देशमुख ….
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.११ नोव्हेंबर – सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय देशमुख यांच्या प्रचारार्थ आकाशगंगा प्रतिष्ठान भवानीपेठ शाहीर वस्ती येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत धनगर समाज सुधारक मंडळ व आकाशगंगा प्रतिष्ठान शाहीर वस्ती, मराठा वस्ती, बुधले गल्ली येथील सर्व धनगर समाज बांधवांनी महायुतीचे उमेदवार विजय देशमुख यांना जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी व्यासपीठावर सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विजय देशमुख,माजी सभागृहनेते संजय कोळी, माजी नगरसेवक अनंत जाधव, संजय कणके, जागृती नवरात्र महोत्सव मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सिद्धू अण्णा गुब्याडकर, माजी परिवहन सभापती बाळासाहेब आळसंदे, धनगर समाज सुधारक मंडळाचे अध्यक्ष व्यंकट कणके राजश्री कणके आदी उपस्थित होते.
यावेळी धनगर समाजाच्या नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की कायम या भागातील धनगर समाज हा आमदार विजय देशमुख यांच्या पाठीशी उभा आहे आमदार विजय देशमुख यांनीही समाजासाठी खूप काही दिले आहे आत आपल्याला या निवडणुकीत विजय देशमुख यांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन यावेळी समाजातील जेष्ठ नेत्यांनी केले व समाजातील गोरगरीब मुला-मुलींचे लग्न होण्याच्या अनुषंगाने धनगर समाजासाठी एका मंगल कार्यालयाची अत्यंत गरज आहे त्यासाठी आपण जागा व निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार विजय देशमुख म्हणाले की धनगर समाज हा भारतीय जनता पार्टीचा अविभाज्य घटक आहे प्रत्येक निवडणुकीत धनगर समाज हा भारतीय जनता पार्टीच्या व माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला आहे आज धनगर समाजाचे सोलापूर महानगरपालिकेत तीन नगरसेवक आहेत तुम्ही सर्वांनी एकजूट दाखवावी व आपले तीन नगरसेवकाचे चार नगरसेवक कसे होतील यासाठी सर्वांनी एक दिलाने प्रयत्न करावेत मी कायम धनगर समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील असे आश्वासन यावेळी महायुतीचे उमेदवार विजय देशमुख यांनी दिले. यावेळी संजय कणके, हिरालाल अटटे, व्यंकटेश कणके, विठ्ठल अटटे, सिद्धाराम बोराळे, श्रीधर हांडे, सुनील कणके, यांच्यासह धनगर समाज बांधव व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.