तेलगू सुपरस्टार तथा तेलंगणाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा जंगी रोड शो..
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात विजय देशमुख यांना निवडून देण्याचे केले आवाहन
प्रतिनिधी /सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१६ नोव्हेंबर –
आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि पॉवरस्टार म्हणून ओळखले जाणारे सिनेअभिनेते पवन कल्याण यांनी शनिवारी रोड शो करीत भाजपा आणि महायुतीचे शहर उत्तर मतदारसंघाचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांना निवडून देण्याचे आवाहन केले. सुमारे ५ किमी अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या सोलापूरकरांची मने पवन कल्याण यांनी जिंकली.
अक्कलकोट रोड येथील पाणी टाकीजवळ सिने अभिनेते पवन कल्याण यांचे आगमन होताच उघड्या वाहनाध्ये उभे राहिलेल्या अभिनेते पवन कल्याण आणि भाजपा महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांचे नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जेसीबीने फुले उधळून त्यांचे भव्य स्वागत केले. वाहनात उभे राहून त्यांनी नागरिकांना महायुतीला मत देण्याचे आवाहन केले. नागरिकांनीही त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद देत भाजपा आणि महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी सुपरस्टार पवन कल्याण यांना पाहण्यासाठी त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी नागरिकांची रस्त्याची दुतर्फा एकच गर्दी दिसून आली.