प्रभाग क्रमांक चार मध्ये भाजपच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद.. माजी नगरसेवक विनायक विटकर यांचा पुढाकार

प्रभाग क्रमांक चार मध्ये काढण्यात आलेल्या पदयात्रेत उत्स्फूर्त प्रतिसाद..

माजी नगरसेवक विनायक विटकर यांचा पुढाकार..!

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर,दि.१३ नोव्हेंबर – 

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजय देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक चार मध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तरटी नाका पोलीस चौकी येथील लक्ष्मण महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या पदयात्रेस सुरुवात झाली.

               वच्छा कमळ वच्छा रे कमळ वच्छा अशा  घोषणांनी वडर गल्ली परिसर दुमदुमून गेला होता ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या,फुलांची पुष्पृष्टी व आमदार विजय देशमुख यांचे औक्षण करून मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना माजी नगरसेवक विनायक विटकर म्हणाले की मतदारांचा वाढता प्रतिसादामुळे आमदार विजय देशमुख यांचा विजय निश्चित आहे मतदार खंबीरपणे आमदार विजय देशमुख यांच्या पाठीशी उभे आहेत.

 यावेळी माजी नगरसेवक विनायक विटकर, गौतम भांडेकर महेश तापडिया, गोपाळ झ्वहर, बाळू दरक, वैभव मुद्दे , प्रवीण भोसले, नागेश अलकुंटे,बंडू कुलकर्णी, निलेश यमपुरे, अमृत कांदगावकर ,सुनील यमपुरे यांच्यासह प्रभाग क्रमांक चार मधील भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *