भाजपच्या बालेकिल्ल्यात देशमुखांच्या पदयात्रेस उस्फुर्त प्रतिसाद !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.१२ नोव्हेंबर –
विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात चुरस आणखीन वाढत चालली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. एकीकडे आघाडीचे कोठे तर दुसरीकडे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. जागोजागी उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे.
दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या बालेकिल्लात आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पदयात्रेस परिसरातील सर्व प्रतिष्ठान मंडळींनी सहभाग नोंदवाला.आमदार विजयकुमार देशमुख यांचे जागोजागी औक्षण करून स्वागत करण्यात आले.
शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये १९९५ पासून भाजपचा झेंडा करण्यात आला असून आमदार देशमुख मालकांनी विकासाची अनेक कामे केली आहेत. युवक वर्गापासून ते ज्येष्ठ नागरिक यांचा आजच्या पदयात्रेत लक्षणीय सहभाग आहे. मागील मताधिक्यापेक्षा यंदा मताधिक्य वाढेल असे भाजपचे जगदीश व्हंड्राव यांनी सांगितले.आमदार देशमुख यांचे मताधिक्य प्रत्येक निवडणुकीला वाढत असून यंदा एक लाख मतांनी निवडून आणण्याचा संकल्प आम्ही मतदार बांधवांनी केलेला आहे असे आशिष दुलंगे, विमल पुट्टा यांनी सांगितले. ही पदयात्रा जोडभावी पेठ कुंभारवेस चौडेश्वरी मंदिर कन्नड चौक शिंदी खाना जैन मंदिर बिना जनरल स्टोअर येथे संपन्न झाली.
या पदयात्रेत प्रशांत फत्तेपूरकर, नागेश गंजी, श्रीनिवास दंडी ,भीमाशंकर पदमगोंडा ,सिद्धाराम मठपती, विजयालक्ष्मी गड्डम, इंदिरा कुडक्याल, लता इंडे ,आशा होनराव, राजेश्री हवले,रंगनाथ बंकापूर, रमेश दुलंगे, आप्पासाहेब पटणे ,मल्लिनाथ वारद, बसवराज हिंगमिरे ,अजित यादवाड, रमेश ऊळागडे, प्रशांत धनुरे ,जगदीश बोडा,विजय मद्दा,संतोष कोळी, नागनाथ कोळी, इंद्रजीत सुरवसे, नागनाथ बिराजदार,वीरेश वारद, ऋषी हिंगमिरे, राजेश बुध्दे आदींचा सहभाग होता.