दमदार आ.विजय देशमुख यांच्या प्रभाग क्रमांक पाच मधील पदयात्रेस उसळला भीमसागर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांचा पुढाकार

दमदार आ.विजय देशमुख यांच्या प्रभाग क्रमांक पाच मधील पदयात्रेस उसळला भीमसागर 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांचा पुढाकार….

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१४ नोव्हेंबर –

निळ्या टोप्या,निळे,भगवे शेले व जय भीम आमदार विजय देशमुख तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर गेला दुमदुमून,औचित्य होते, सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजय देशमुख यांच्या प्रचार रॅलीचे…!

सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार आमदार विजय देशमुख यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेची सुरूवात प्रबुद्ध भारत चौक,येथुन झाली. या पदयात्रेच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आमदार विजय देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना घेऊन या पदयात्रेत सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेवक गणेश पुजारी, अमर पुदाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे, माजी नगरसेविका स्वाती आवळे, नगरसेविका वंदना गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते भारत बापरे, उद्योजक इद्रमल जैन, गौतम संचेती, पुरुषोत्तम धूत, अनिल छाजेड,पी.बी .ग्रुप प्रमुख गौतम चंदनशिवे, लालू खंडेलवाल, अजित गायकवाड ,समाधान आवळे, दशरथ कसबे , सामाजिक कार्यकर्ते पिंटू डावरे,गौतम कसबे, श्रीमंत जाधव ,चंद्रकांत सोनवणे, धम्मपाल मंदर्गीकर, अविनाश भडकुंबे , गोपीनाथ जाधव,उमेश रणदिवे, पी बी ग्रुप अध्यक्ष आदित्य चंदनशिवे, धनराज तळभंडारे, सिद्धार्थ सुर्वे आदी  मान्यवरांची उपस्थिती होती.

     सदर पदयात्रा प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर ,बुधवार पेठ मिलिंद नगर बुधवार पेठ येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर येथे  अस्थिविहार (प्रेरणाभूमी) येथे वंदन करून, मिलिंद नगर येथील मिलिंद बुद्ध विहार येथे वंदन केले यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूड पुतळ्यास अभिवादन करून नरवीर तानाजी चौक, साठे चाळ, पठाण चाळ, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर, वीरकर गणपती भगती मंदिर तसेच मुक्ताबाई साळवे नगर विरकर गणपती येथे पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *