आ.सुभाष देशमुख यांना हॅट्रिक साधणार ; संभाजी आरमारसह विधीज्ञ संघटनेचा एकच निर्धार  !

आ. सुभाष देशमुख यांना हॅट्रिक साधणार ; संभाजी आरमारसह विधीज्ञ संघटनेचा एकच निर्धार  !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. ११ नोव्हेंबर – दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांना दिवसेंदिवस विविध संघटना आणि समाजाचे पाठबळ वाढत आहे. संभाजी आरमार आणि दक्षिण तालुका विधीज्ञ संघटनेचा पाठिंबा मिळाला. या सर्वांनी आमदार देशमुख यांना दक्षिणमधून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. पाठिंबा दिल्याबद्दल या सर्वांचे आमदार देशमुख यांनी आभार व्यक्त केले.

संभाजी आरमारच्या पदाधिकार्‍यांनी निवासस्थानी आ.देशमुख यांची भेट घेत पाठिंबा दर्शवला. यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष तात्या वाघमोडे, सरचिटणीस गजानन जमदाडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, सागर ढगे, शहरप्रमुख राजेश पाटील, ज्ञानेश्वर डोंबाळे, रेवणसिद्ध कोळी, प्रमोद जगताप, अर्जुन शिवसिंगवाले, अमित कदम, प्रविण मोरे, राम वाघमोडे, राज जगताप, रवि वाघमोडे आदी उपस्थित होेते. संभाजी आरमारचे सर्व पदाधिकारी आमदार सुभाष देशमुख यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील, असे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी सांगितले.

दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील विधिज्ञ संघटनेच्या शिष्टमंडळाने आ. देशमुख यांची भेट घेत पाठिंबा दर्शविला. विधानसभा निवडणुकीमध्ये आ. देशमुख यांना विजयी करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. यावेळी ऍड. लक्ष्मण पाटील, ऍड. विक्रम कटुळे, ऍड. चंद्रकांत नाईकवाडे, ऍड.दीपक केसकर, ऍड.एस.एल. राजमाने, सी.एम. सावंत, ए.सी. सावंत, ऍड. जयप्रकाश भंडारे, ऍड.एस.ए. मचाले यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांचे आ. देशमुख यांना आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *