मित्रनगर, शेळगी आणि दहिटणे भागात भाजपचा जोर ;
शेळगीवासीयांनी दिली मालकांना पहिली पसंती ; प्रचारा दरम्यान महिलांनी धरला फेर…!
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.८ नोव्हेंबर – शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ शहरातील शेळगी परिसरात पदयात्रेचे नियोजन करण्यात आले होते. सदरची पदयात्रा मित्र नगर येथून सुरुवात झाली. शेळगी भागातील प्रत्येक वसाहतीत आमदार देशमुख यांचे स्वागत ढोल ताशा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने करण्यात आले. या भागातील शेकडो माता भगिनींनी आमदार देशमुख यांचे औक्षण केले. पदयात्रेदरम्यान माता-भगिनी फेर धरला, आमदार देशमुख यांचे स्वागत वाजत गाजत नाचत झाले.
दरम्यान गेली अनेक वर्षे महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या कोठे यांनी कोणता विकास केला ?असे म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांनी शेळगी परिसराचा कायापालट केला आहे तो येऊन प्रत्यक्ष पहावा. मग कळेल तुम्हाला विकास म्हणजे काय असे म्हणत संपूर्ण शेळगी, दहिटणे,मित्र नगर परिसरात दाखवू असे भाजपचे ज्ञानेश्वर कारभारी यांनी शुक्रवारी सकाळी पदयात्रेवेळी सांगितले.
मागील सात आठ वर्षात शेळगी मध्ये शेकडो कोटींची कामे झालीत यामुळे येथील जनता समाधानी आहे. आमदार देशमुख यांच्या माध्यमातून शेळगी भागातील प्रत्येक नगरामध्ये मूलभूत सोयी सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे असे सोमनाथ रखबले वीरेश उंबर्जे यांनी सांगितले.
सोलापूर शहर राष्ट्रवादी पक्षाची संपूर्ण ताकद आमदार देशमुख यांच्या प्रचारामध्ये आम्ही लावली आहे. विजयकुमार देशमुख यांचे अनुक्रमांक दोन आहे. यामध्ये विजयाची खूण दिसते. विकास कामाच्या जोरावर लाखो मतांनी विजय साध्य करून दाखवू असे राष्ट्रवादी पक्षाचे प्रकाश जाधव यांनी सांगितले.
समाजातील प्रत्येक वर्गाशी आमदार देशमुख यांचा वैयक्तिक संपर्क आहे. त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा माणूस म्हणून आमदार देशमुख हे सर्वश्रुत आहेत. घरकुल पासून बाळे कोंडीपर्यंत प्रत्येक घराघरातील एक व्यक्ती म्हणजे आमदार देशमुख. या सर्व भागात केलेल्या कामाच्या जोरावरच आमदार देशमुख हे पाचव्यांदा विक्रमी मतांनी विधानसभेत पाऊल ठेवतील असे बाजार समितीचे माजी संचालक बसवराज इटकळे यांनी सांगितले.
या पदयात्रेमध्ये माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, डॉक्टर किरण देशमुख, अविनाश पाटील, माजी नगरसेविकाशालन शिंदे, कल्पना कारभारी, सिद्धया स्वामी हिरेमठ सुरेश हत्ती, वैभव बरबडे, एन डी जावळे, अनिल छत्रबंद, सिद्धाराम नागशेट्टी, महादेव यलशेट्टी,नागेश उंबर्जे, संतोष बंडगर, शंकर शिंदे, दीपक सुरवसे, धोंडप्पा वग्गे, विनायक चीनकेरी, गुंडू निर्मळ, सचिन लड्डा, अजहर शेख, बाबा शिंगाडे, संतोष मकाशे, सागर गव्हाणे, मुस्ताक पटेल आदींनी सहभाग नोंदवला.