कोंडी आणि तांड्यावर विजय देशमुखांनाच पहिली पसंती ; ग्रामस्थ देशमुख यांच्या पाठीशी
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.७ नोव्हेंबर – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आ.विजयकुमार देशमुख, महेश कोठे आणि शोभा बनशेट्टी यांच्यात तिरंगी लढत पहावयास मिळत आहे. या लढतीत विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी कोंडी आणि तांडा येथील गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता.
या गावभेटीत सरपंच मनोज निंबाळकर, उपसरपंच शिवाजी निळ, भारत पाटील, दत्तात्रय भोसले, गणेश भोसले, राहुल निंबाळकर, बाळासाहेब मोरे, राजेंद्र भोसले, लक्ष्मण साबळे, किसन भोसले, सुदर्शन माळी, दत्ता वाघमारे, खलील सय्यद, बालाजी भोसले, तुकाराम पवार, शंभुराजे निळ, नामदेव सुतार, भास्कर सुतार, शंकर राठोड, विकास चव्हाण, सुरेश राठोड, गौतम वाघमारे यांच्यासह सर्व ग्रामस्थ समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती आदींची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
दरम्यान मागील दहा वर्षात ज्या काही सुविधा राज्य सरकारकडून देण्यात येतील त्या देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. येथील शेतकऱ्यांचा आणि युवा वर्गाच्या रोजगाराचा प्रश्न निवडणुकीनंतर राज्य सरकारकडे पाठपुरावा करू असे आश्वासन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिले. नागरिकांच्या घराघरात परिचित असलेला आमदार विजयकुमार देशमुख यांचं नाव हे स्वच्छ प्रतिमेचं आणि विकासाचं शाश्वत नाव आहे. गावात यंदा नऊ ते दहा कोटी रुपये पर्यंतची काम झाली आहेत. कोंडी गावावर आमदार देशमुख यांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे आम्ही कोंडी भागातून मालकांना एकतर्फी मतदान करून दाखवू, असे कोंडी येथील संजय पवार यांनी सांगितले.
आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशिवाय आमच्या गावाला कुठल्याही पक्षाचा एक रुपयाही निधी आजपर्यंत देण्यात आला नाही. जे काही सुविधा गावात आल्यात ते फक्त आमदार देशमुख यांच्यामुळेच आलेल्या आहेत. आम्ही सर्व ग्रामस्थ एकमताने महायुतीचे उमेदवार विजय देशमुख यांना निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहोत असे महादेव राठोड यांनी सांगितले.
आमच्या गावात सार्वजनिक दिवाबत्ती नव्हती. संपूर्ण गावात अंधार होत. आमदार देशमुख यांच्या प्रयत्नाने गावात लाईटची व्यवस्था आली. बंदिस्त ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे. आमच्या ग्रामदेवताच्या मंदिरासमोर सुशोभीकरण झालेले आहे. रस्त्यांची सुविधा सुरू आहे. यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ देशमुखांच्या कार्यपद्धतीवर समाधानी असून येत्या, विधानसभेच्या निवडणुकीत देशमुख यांचा भरघोस मतांनी विजय होईल असे कोंडी तांडा येथील राठोड यांनी सांगितले.
शहर उत्तरला हा भाग जोडल्यापासून गावामध्ये विकास काय असतो हे कळाले आहे. आमदार देशमुख जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर आमच्या गावांमध्ये विकास कामांना गती आली. गावात कोट्यावधीची कामे झाली. विरोधी पक्षातील उमेदवार कोण आहेत हे आम्हाला माहितीच नाही. आमच्या ग्रामस्थांच्या प्रत्येक मागणी देशमुख मालकांनी पूर्ण केले आहे येत्या २३ तारखेला आम्ही पण आमचा दिलेला शब्द पूर्ण करून दाखवू आणि पाचव्यांदा विधानसभेत देशमुख यांचे नाव पोहोचवू. असा शब्द संजय पवार यांनी दिला.यावेळी सुतार परिवार आणि माळी वस्तीवर देशमुखांचे स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीने आणि माता भगिनींच्या वतीने औक्षण केले.