विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ हजारोंचा जनसमुदाय ; विडी घरकुल भागात विजय मालक जोरात 

 विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ हजारोंचा जनसमुदाय ;

विडी घरकुल भागात विजय मालक जोरात !

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.७ नोव्हेंबर – जुना घरकुल येथील केलेल्या विकास कामाच्या जोरावर आमदार देशमुख यांना घरकुल भागातून वीस हजार मतांचे मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करू असे भारतीय जनता पक्षाचे राजू हिबारे यांनी सांगितले. विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचा आयोजन करण्यात आला होता. जागोजागी महिलांनी आमदार देशमुख यांचे औक्षण करून फटाक्यांच्या आतिशबाजीने बाजूने स्वागत केले.

     घरकुल हा भाग ३० वर्षापासून मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित होता. या भागातील नेते यांनी येथील जनतेची काळजी घेतलीच नाही. फक्त निवडणुकीपुरता येथील जनतेला वापरून सोडून द्यायचं हा एक कलमी कार्यक्रम येथील नेत्याने राबविला होता. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून या भागात मुख्य रस्ते अंतर्गत रस्ते पिण्याचे पाईपलाईन बंदिस्त ड्रेनेज लाईन दिवाबत्ती आदींची सोय महापालिका अस्तित्वात नसताना करून घेता आली. यामुळे येथील जनता समाधानी आहे असे राजू हिबारे यांनी सांगितले.

       केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घरकुल येथील नागरिक माता-भगिनी कामगार वर्ग घेत आहेत. लाडकी बहीण, बांधकाम कामगार योजना, आयुष्यमान योजना, उज्वला गॅस योजना,कोणतेही तारण शिवाय उद्योग व्यवसायासाठी कर्ज असे इत्यादी योजनांचे लाभ मिळाले.  त्याचे सर्वाधिक लाभधारक जुना घरकुल येथे आहेत यामुळे हे सर्व जनता महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मागे असल्याचा विश्वास ब्रह्मदेव गायकवाड आणि रुपेश भोसले यांनी दाखविला. यावेळी विनोद केंजरला, रुचिरा मासम, विजय इप्पाकायल , रविकांत वाघमारे, रुपेश भोसले आदींची उपस्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *