प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपला वाढतोय पाठिंबा ;
आमदार देशमुख यांच्या पदयात्रेत हजारो महिलांची उपस्थिती !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.९ नोव्हेंबर – विधानसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ धरमसी लाईन,मनोहर नगर ,उमा नगरी,अभिषेक नगर,जुनी पोलीस लाईन आणि प्रभाग क्रमांक सहा येथे शुक्रवारी सायंकाळी पदयात्रेच्या आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत जागोजागी आमदार देशमुख यांचे महिलावर्गांकडून ओक्षण करण्यात आले. ढोल ताशा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले.
दरम्यान येथे केंद्र आणि राज्य शासनाचे अनेक योजनांचे लाभ आम्ही वेळोवेळी नागरिकांना उपलब्ध करून दिले आहे. देशमुख मालकांच्या प्रचारार्थ मिळणाऱ्या प्रतिसादामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. प्रभाग क्रमांक सहा हा सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणारा भाग ठरेल असे भाजपचे किरण पवार यांनी सांगितले.
आमदार देशमुख हे नागरिकांच्या कायम संपर्कात राहत असतात आमच्या अनेक अडीअडचणी सोडवण्याचे काम देशमुख यांनी केले आहे. त्यामुळे आजच्या पदयात्रेत आम्ही स्वयंस्फूर्तीने सहभागी झालो असून भाजप अथवा देशमुख मालकांसाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहो असे या भागातील नागरिक पूजा कुडल आणि प्रतीक्षा शहा यांनी सांगितले.