प्रभाग क्रमांक १ विजय देशमुख यांना देणार मताधिक्य ; पदयात्रेस हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रभाग क्रमांक १ विजय देशमुख यांना देणार मताधिक्य ; पदयात्रेस हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग…

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दी.११ नोव्हेंबर – महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक एक येथे  तुळजापूर नाका देवी मंदिरात  पूजन करून महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत पदयात्रा निघाली. पदयात्रा शांतीनगर,जोशी चौक, विजय भवानी देवी मंदिर, बालाजी ग्रुप, माऊली चौक, साखळी विहीर, धोत्रीकर वस्ती, मनपा शाळा, दुर्गादेवी मंदिर, अन्नपूर्णा गेट, सहस्रण प्रशाला येथे संपन्न झाली.

  या भागात कष्टकरी वर्गाची संख्या मोठी आहे.मागील आठ वर्षात आमच्या प्रभागात मूलभूत सुविधांसाठी आमदार देशमुख यांनी सर्वाधिक निधी दिला असून विकास कामाच्या जोरावर आम्ही आमच्या प्रभागांमध्ये दहा हजार मतांचे मताधिक्य देऊ अशी ग्वाही भाजपचे संजय कणके यांनी या पदयात्रे दरम्यान दिली.

  आमच्या प्रभागातील पदयात्रेत महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे. देशमुख मालक एक लाख मताच्या फरकाने निवडून येतील. राज्य मंत्रिमंडळात आमदार देशमुख हे कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतील असे मंडल अध्यक्ष प्रथमेश आनंदकर यांनी सांगितले…

महायुतीच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली आहेत. ऊबाठा सेना, राष्ट्रवादी पवार गट यांना येथे कार्यकर्ते मिळाले नाहीत.एक रुपयाचा निधी देऊ न शकणारे कसे निवडून येतील. असे शिवसेना शिंदे गटाचे संजय सरोदे यांनी सांगितले.या पदयात्रेत माजी सभागृह नेते संजय कोळी, बाबुराव जमादार,युवराज भोसले, सोमा शिंदे,संभाजी अडगळे, दशरथ दांडेकर, राज बंडगर, गजानन कोळी,पप्पू वालीकर,राज हिरेमठ, रोहित गोरे ,मनोज कलाल ,मालू रेवे, दीपक फकरे, योगेश पाटील, संजय पुजारी ,सोमा पंतोजी ,स्वामी वरगंटी, लिंगप्पा शिरकुल,लकी शिरकुल, शिवा शिरकुल, सुरेश धोत्रे, बंदेनवाज शेख, सचिन पाटील, वीरेश कलशेट्टी, राज पुजारी, अंबादास पुजारी, शंकर आचीमणी,प्रकाश कारंडे, अनिल इडागोटे, प्रसाद माळगे ,प्रभू सुलतानपुरे,मल्लू सुलतानपुरे,सिद्धू जमादारखाने,सिद्धू मुलीमनी, आनंद नरोटे ,अय्याज शेख ,गुंडू हेर, प्रकाश झाडबुके, सुरेश सुलतानपुरे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *