सासऱ्यांसाठी सुनबाई निवडणुकीच्या मैदानात ; डॉ. उर्वशी देशमुख यांनी घेतली प्रचारात आघाडी…
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर, दि.८ नोव्हेंबर – सोलापूर शहर उत्तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुक भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय सिद्रामप्पा देशमुख यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सुनबाई डॉ. उर्वशी ताई किरण देशमुख यांनी प्रभाग १० व ११ मधील विडी कामगारांशी संवाद साधत त्यांचे अडचणी जाणून घेतल्या व ते सोडविण्याचे आश्र्वस्थ केले. भाजपा व महायुतीने महिलांना सक्षम व सन्मान करणारे अनेक निर्णय घेतलेले आहे. महायुतीचे उमेदवार विजय देशमुख यांना २० नोव्हेंबर रोजी ०२ क्रमांकाचे कमळ समोरील बटण दाबून मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी सर्व विडी कामगार महिलांनी महायुती सरकार व आमदार विजय देशमुख यांनी आमच्या भागात मूलभूत सोयीसुविधेची मोठी विकासकामे केलेली आहेत. लाडली बहीण सारख्या योजना देऊन सन्मान करणाऱ्या भाजपालाच मतदान करणार असे माता – भगिनींनी डॉ. उर्वशी ताईंना अभिवचन दिले.आमदार विजय देशमुख यांच्या प्रचारार्थ सुनबाई सहभागी झाल्याने महिलां वर्गात कुतूहलाने चर्चा सुरू आहे.
यावेळी महिला मोर्चाचे अध्यक्ष विजया वड्डेपल्ली, माजी नगरसेविका इंदिरा कुडक्याल, माजी नगरसेविका सोनाली मुटकिरी, संगीता खंदारे, कु. रुचिरा मासम, लता नराल, भाग्यलक्ष्मी म्हंता, शिल्पा देशमुख, प्रतिभा पसारे आदीसह प्रभाग १० व ११ मधील महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होते.