जनता जशी डोक्यावर घेते तशी खाली देखील आणते, वीस वर्षे संधी देऊन काही केलं नाही… विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप…

जनता जशी डोक्यावर घेते तशी खाली देखील आणते, वीस वर्षे संधी देऊन काही केलं नाही…

आ.देशमुखांनी वीस वर्षे फक्त घराघरात भांडणे लावण्याचे काम केले – महेश कोठे

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि.१५ नोव्हेंबर –

विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना दिसत आहेत. यंदा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजप आणि विरोधक राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात काटे की टक्कर दिसत आहे. गेला वीस वर्षांचा हिशोब सत्ताधाऱ्यांकडून विरोधक मागत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी विरोधकांना महापालिकेचा हिशोब मागत आहे. अशा पद्धतीने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात वातावरण चांगलेच गरम झालेले दिसत आहे.

 त्याचा अनुषंगाने महाविकास आघाडीचे शहर उत्तरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांना दिवसेंदिवस नागरिकांचा पाठींबा मिळत आहे, पदयात्रा, होम टू होम प्रचार कॉर्नर बैठका घेऊन महेश कोठे हे जनतेपर्यंत पोहोचलो आहेत, नगरसेवक होऊन विडी घरकुल जो विकास केला आहे, तसाच विकास महेश कोठे यांना शहर उत्तरचा आमदार करून पाहायचं अस नागरिकांमधून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत ,

दरम्यान बुधवारी सायंकाळी कॉर्नर बैठकीच्या माध्यमातून महेश कोठे मतदारांशी संवाद साधला, यावेळी महेश शहर उत्तरचे आमदार यांचा खरपूस समाचार घेतला, जनता जशी डोक्यावर घेते तशी खाली देखील आणते, वीस वर्षे संधी देऊन मतदार संघासाठी काही केलं नाही,  वीस वर्षे घरात बसून घरोघरी भांडणे लावण्याचे काम देशमुख यांनी केले असल्याचे कोठे म्हणाले… यावेळी स्थानिक नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *