इतरांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये ; मालक भडकले…! केली कठोर शब्दात टीका…

इतरांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये ; मालक भडकले…

म्हणाले चार वेळा पक्ष बदल, करूनही काही साध्य झाले नाही त्यांनी बोलू नये.

प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,

सोलापूर, दि. २८ ऑक्टोंबर – सोलापूरचे लक्ष लागलेल्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे मागील चार टर्म आमदार राहिलेले माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनाने दाखल आज दुपारी दाखल केला. यावेळी महायुती मधील नेतेमंडळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.विजयकुमार देशमुख यांच्या राजवाडे चौकातील कार्यालयापासून त्यांची रॅली निघाली.

      

     उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना आ.देशमुख म्हणाले, मी मागील चार टर्म या मतदारसंघाचा आमदार आहे. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांशी माझा संबंध येतो परंतु माझ्या विरोधातील उमेदवार ज्याला स्वतःचा पक्ष माहित नाही वर्षातून चार वेळा पक्ष बदलतो, आपल्या मतदारांची इज्जत अब्रू चार पक्षाच्या समोर लिहून घालवली. पण मी आज पर्यंत भाजपचा सभासद आहे. आणि राहणार. त्यामुळे अशा लोकांनी आम्हाला शिकवू नये या शब्दात नकळत महेश कोठे यांच्यावर टीका केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *