आरंभ शहर मध्यच्या विकास पर्वाचा ! शुभारंभ विकास कामांचा !

249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ
सोलापूर व्हिजन न्युज / प्रतिनिधी
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार देवेंद्र कोठे यांच्या पुढाकारातून विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न होणार आहे. जनतेच्या सहाय्यतेसाठी सदैव तत्पर असणारे देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष निधीतून विविध विकास कामांचा सपाट अस लावला आहे. त्याच विकास कामांचे उद्घाटन होणार आहे.

विकास कामांचे यादी पुढीलप्रमाणे
▶️14 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ
▶️मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित शालेय विद्यार्थ्यांना 55,555 वह्या वाटपाचा शुभारंभ
▶️सोलापूर महानगरपालिकेच्या ६ आयुष्यमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन
▶️अक्कलकोट रोड शासकीय तंत्रनिकेतन लगत अर्बन मल्टी स्ट्रीट पार्कचे

उद्घाटन पालकमंत्री मा.श्री.जयकुमार भाऊ गोरे यांच्या शुभहस्ते अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी,सोलापूर महापालिकेचे आयुक्त श्री.सचिन ओंबासे साहेब तसेच भाजपा आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

तरी सोलापूर शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की या शुभारंभ सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकास पर्वात सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती …

सोमवार दिनांक 28 जुलै 2025
वेळ – सायंकाळी 05 वाजता
स्थळ – चिल्ड्रन पार्क,कर्णिक नगर रिक्षा स्टॉप जवळ सोलापूर