ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांच्या शिवयोग समाधीस अननस द्राक्षे ऊस अशा विविध फळांचे सजावट…
समाधी वर्षांनिमित्त सिद्धेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे झाले आयोजन !
प्रतिनिधी / सोलापूर व्हिजन न्युज,
सोलापूर दि.२ मार्च
सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या शिवयोग समाधीस आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. द्राक्षे अननस ऊस असे विविध फळ आणि सुवासिक फुलांची आरास समाधी परिसरात करण्यात आली होती. यामुळे सर्वत्र नवचैतन्याचे आणि प्रसन्नतेचे वातावरण पसरले होते. श्री सिद्धेश्वर महाराजांच्या समाधी वर्षा निमित्त मंदिर परिसरात सजावट आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती मंदिराचे पुजारी शिवशंकर हब्बू यांनी यावेळी दिली.
दरम्यान, सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या समाधी वर्षानिमित्त पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. पुरोहितांच्या मंत्रघोषात समाधीस रुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी बारा वाजता तांदूळ पूजा करण्यात आली. तदनंतर श्रींच्या मूळ मूर्तीस देखील रूद्रभिषेक आणि महाआरती करण्यात आली. सायंकाळी मंदिर परिसरात दीपोत्सव संपन्न झाला.

तिथीनुसार मंदिर परिसरात समाधी वर्षानिमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न
सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी तिथीनुसार समाधी वर्षानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या समाधीस आकर्षक अशी फळांची सजावट करण्यात आली होती. त्यानंतर दुपारी बारा वाजता तांदूळ पूजा करून श्रींची महाआरती करण्यात आली. त्याच पद्धतीने मूळ मूर्तीस देखील रुद्राभिषेक व महाआरती करण्यात आली. पहाटे सामूहिक रुद्र पठण तसेच सकाळी भजनी मंडळाच्या वतीने भजन गायन कीर्तन करण्यात आले. संध्याकाळी परिसर उजळून निघाला. भाविकांनी पहाटेपासूनच श्रीधर दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती.
शिवशंकर हब्बू, श्री सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी