solapur-city-god-shri-siddheshwar-temple-spiritual-program-and-flowers-decoration महाआरती, महापूजा, मंगलवाद्यांच्या अन् पुरोहितांच्या मंत्रघोषाने पसरले नवचैतन्य…
पवित्र श्रावणातील पहिल्या सोमवारी आबालृद्धांनी घेतले श्रींचे मनोभावे दर्शन …
सोलापूर व्हिजन
सोलापुर दि ५ ऑगस्ट – ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात श्रावण मासातील पहिल्या सोमवार निमित्त आभार वृद्ध भाविकांची श्रींचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच मांदियाळी दिसून आली. दर्शन रांगा तसेच मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेलेले दिसून आले. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या पवित्र महिन्यात अबालवृद्ध आणि महिला भाविक उपवास व्रतव्यकल्य करतात. श्रावणामध्ये अनेक नियमांचे पालन करून धार्मिक विधी विधान संपन्न केले जातात.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या मंदिरात सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रम मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न करण्यात आले. पहाटे श्रींच्या गर्भ गाभाऱ्यात महाअभिषेक,महाआरती,महापूजा त्यानंतर अक्कीपूजा संपन्न करण्यात आली. यावेळी श्रींच्या गर्भ गाभाऱ्यात दर्शन घेण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातून आणि कर्नाटक,आंध्र प्रदेशातून भाविक दाखल झाले होते.त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब दर्शन रांगा लागल्या होत्या. दर्शन घेताना कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी महिला आणि पुरुष अशा दोन वेगवेगळ्या दर्शन रांगाचे नियोजन मंदिर देवस्थान पंचकमिटीच्या वतीने केले आहे.
तत्पूर्वी मध्यरात्री शिवयोग समाधीस मेघडंबरीस महादेव आणि त्यांचे शिष्य यांची प्रतिमा असलेले आकर्षक असे विविध फुलांची सजावट भक्त सोमनाथ केंगाळकर परिवाराकडून श्रींच्यासेवा रुपात अर्पण करण्यात आली. पहाटे मंदिरात धार्मिक विधी करण्यात आले त्यानंतर समाधीवर बिल्वपत्र अर्पण आणि ओम नमः शिवाय जप करून महाआरती करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता शिवयोग समाधीस्थळी महाआरती करण्यात आली. यावेळी समाधी परिसरात अबालवृद्ध आणि महिला भाविकांची मांदियाळी दिसून आली. प्रत्येक आरतीच्या माध्यमातून श्रींची कृपादृष्टी आपल्यावर आणि आपल्या परिवारावर रहावी याच उद्देशाने भाविक भक्त असुसलेले दिसून आले.
बिल्वपत्र अर्पण करून संपन्न झाली श्रींची महापूजा….
श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या पवित्र महिन्यात असंख्य भाविक श्री शिवयोगी सिद्धेश्वर मंदिरात श्रींच्या दर्शनास येतात. सकाळी विविध धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर शिवयोग समाधीस बिल्वपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय जप करण्यात आला. सकाळी ठीक साडेआठ वाजण्याच्या सुमारास समाधीस केंगनाळकर परिवाराकडून प्रथम महापूजा संपन्न करण्यात आली.
– शिवशंकर हब्बू , श्री शिवयोग सिध्देश्वर देवस्थान पुजारी सोलापूर.
श्रींचे दर्शन घेऊन पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात……..
श्रावणातील पहिल्या सोमवारी सकाळी सकाळी श्रींचे दर्शन घेऊन पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात करावी, या उद्देशाने मंदिरात पहाटेच आले होते. सकाळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. दर्शनरांगा मधून श्रींचे दर्शन घेऊन मन आनंदी आणि तृप्त झाले. या पवित्र महिन्यातील प्रत्येक सोमावारी आणि शुक्रवारी मंदिरात दर्शन घेण्यासाठी आम्ही येत असतो.
– पूजा बिराजदार महिला भाविक